Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: ‘फक्त दोन मिनिटे झाली, आत जाऊ द्या’; नाशिकच्या खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना फटका, UPSC केंद्राबाहेर पालकांचा संताप

वर्षानुवर्षांची मेहनत करून UPSCची परीक्षा देण्यासाठी निघाले, पण शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचा उशीर झाला. परीक्षा केंद्राच्या दारापर्यंत पोहोचूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही; संतप्त पालकांनी प्रशासनाला जाब विचारत ठिय्या दिला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 14, 2026 | 03:56 PM
Nashik News: ‘फक्त दोन मिनिटे झाली, आत जाऊ द्या’; नाशिकच्या खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना फटका, UPSC केंद्राबाहेर पालकांचा संताप

Nashik News: ‘फक्त दोन मिनिटे झाली, आत जाऊ द्या’; नाशिकच्या खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना फटका, UPSC केंद्राबाहेर पालकांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • खड्डे, पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे काही विद्यार्थ्यांना उशीर
  • के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात प्रवेश नाकारल्याने आक्रोश
  • पालकांचा संताप; ‘महापालिकेच्या कारभाराची शिक्षा विद्यार्थ्यांना का?’
नाशिक: महापालिकेचा गलथान कारभार, रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे आणि वाहतूक कोंडीचा फटका नाशिकमधील UPSC परीक्षार्थींना बसला. रविवारी (दि. १३) झालेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल प्रबोधिनी द्वितीय (NDA-NA II) परीक्षेसाठी काही विद्यार्थी निर्धारित वेळेनंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, प्रवेशाची वेळ संपल्याचे सांगत त्यांना केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना केवळ काही मिनिटांच्या विलंबामुळे परीक्षा केंद्राबाहेरच थांबावे लागले.

२-३ मिनिटांचा विलंब

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) वतीने रविवारी NDA-NA II परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरातील १३ उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर मात्र प्रवेशाच्या वेळेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला. काही विद्यार्थी निर्धारित वेळेनंतर दोन ते तीन मिनिटांनी केंद्रावर पोहोचले. त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेरच साकडे घालत प्रवेश देण्याची विनंती केली.

हेही वाचा:Fake Medicine Racket: कर्करोगाच्या औषधांचा बनावट धंदा; बंगळुरूतील ९० हून अधिक रुग्णालये रडारवर, SITची धडक कारवाई

खड्डे आणि पावसाचा अडथळा

शहरात रविवारी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातच रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी घरातून तासन्तास आधी निघाले होते. मात्र, रस्त्यातील अडथळ्यांमुळे त्यांना केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटांचा उशीर झाला.

‘फक्त दोन मिनिटे झाली’

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या केंद्राबाहेर प्रवेश नाकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी बंद दरवाजासमोर प्रवेश देण्याची विनंती केली. ‘फक्त दोन मिनिटे झाली आहेत, आत जाऊ द्या’, अशी विनवणी विद्यार्थी करत होते. मात्र, नियमांचा हवाला देत त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. परीक्षा केंद्राच्या दारापर्यंत पोहोचूनही परीक्षा देता न आल्याने काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.

प्रशासनाने नियम सांगितले

या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी UPSCच्या नियमांनुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे आधी प्रवेशद्वार बंद केले जाते, असे स्पष्ट केले. प्रवेशाची वेळ संपल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला शिथिलता देण्याचा अधिकार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा:Firing News: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जुन्या वादातून तीन राऊंड फायर; चारचाकीतून आले अन्…

पालकांचा संताप

मुलांना परीक्षा देता न आल्याने संतप्त पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना उशीर झाला असेल, तर त्याची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. काही काळ परीक्षा केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त पालकांनी UPSCच्या परीक्षा निरीक्षकांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केल्याने गोंधळ वाढला.

नियम विरुद्ध विद्यार्थ्यांची अडचण

सकाळी ९.३० वाजता रिपोर्टिंगची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर काही मिनिटांनी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. UPSC परीक्षेसाठी नियम आणि वेळेचे काटेकोर पालन आवश्यक असले, तरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसामुळे साचलेले पाणी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने परीक्षा केंद्रांभोवती वाहतूक नियोजन केले होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा हुकल्याने नाशिकच्या रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Potholes rain and traffic jams dreams shattered by a margin of mere minutesparents express outrage outside the upsc centre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 03:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.