Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची तयारी; चंद्रभागा स्नानासाठी सुरक्षेचे नियोजन सुरू, प्रशासन सज्ज

यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले,  चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेवून वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 25, 2025 | 03:43 PM
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची तयारी; चंद्रभागा स्नानासाठी सुरक्षेचे नियोजन सुरू, प्रशासन सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

Ashadhi Wari Sohla 2025:  आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात चंद्रभागा नदीत स्नान करणे वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. यात्रा कालावधीत नदी पात्रात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.वारकरी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रभागा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात झाला, त्यानंतर किती वाळवंट शिल्लक राहील याचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करून सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. हरसुरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी घोडके, मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Iran–Israel war : ‘स्मशान शांतता अन् ताजे व्रण…’ इस्रायलमध्ये ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त, पाहा Recent Update

 यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले,  चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेवून वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वारकरी-भाविकांना तसेच दिंड्यांना वाहतुकीचा कोणाताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील व  शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत. पालखी मार्ग व शहरातील  अधिकृत होर्डीगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. तसेच अनाधिकृत होर्डींगवर तात्काळ कारवाई करुन पुन्हा ते होर्डीग लागणार याची दक्षता घ्यावी. होर्डीगमुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
तसेच शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह  खाजगी बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करावा. नदी पात्रात  धोक्याच्या ठिकाणी  माहिती फलक लावावेत, यात्रा कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ, प्रसादाची दुकाने यांच्या  वेळोवेळी तपासण्या कराव्यात. तसेच मठ व धर्मशाळा येथे मोठ्या प्रमाणात अन्न व फराळाचे पदार्थ बनविण्यात येतात. याबाबत संबधितांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच तपासणीसाठी पथके तैनात  करावीत अशा सूचनाही विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी  दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, यावर्षी पाऊस जास्त असण्याची शक्यता असल्याने पालखी तळांवर चिखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच पालखी तळांवर मुरमीकरण करण्यात येत आहे. तसेच वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी पालखी मार्गावर वॉटरप्रूफ मंडप,जर्मन हँगर लावण्यात येणार आहेत.
Menopause नंतर महिलांमध्ये वाढतोय Hip Fracture चा धोका, आहाराबरोबरच हवी व्यायामाची जोड
पालखी मार्गावर भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वेळोवेळी पिण्याच्या पाण्याच्या तपासण्या करण्यात येत आहेत. मुबलक प्रमाणात सुलभ  शौचालयाची उपलब्धता तसेच त्यांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळ व सक्शन मशीन वाहने ठेवण्यात येणार आहेत. या वाहनांना विशेष वाहन म्हणून घोषित करण्यात आले आहे. जेणेकरून शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येईल. त्याचबरोबर महिला भाविकांसाठी स्नानगृहांची संख्या वाढवण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गर्दी व्यवस्थापन, चंद्रभागा नदी पात्रात होडीतून होणारी जलप्रवासी वाहतूक आदीबाबत आवश्यक नियोजन करण्यात आले असून, होडीच्या चालकांना व मालकांना होडीत जलप्रवासी वाहतूकीसाठी एकूण 1 हजार 50 लाइफ जॅकेटची उपलब्धता करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले. तसेच वारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदे मार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

Web Title: Preparations for ashadhi ekadashi in pandharpur security planning for chandrabhaga snan begins administration ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 03:43 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Mahapooja by Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांकडून विठूरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, पहा खास फोटो
1

Mahapooja by Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांकडून विठूरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, पहा खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.