Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्व. प्रतापराव भोसले यांच्या तत्त्वनिष्ठ जीवनकार्याचा ‘आधारवड’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : उल्हास पवार

उच्च शिक्षण पदवी देते; मात्र संस्कार देईलच असे नाही. भाऊंची नाळ शेती आणि मातीशी जोडलेली होती. जो स्वच्छ असतो, तो परखड असतो; मात्र आवश्यक त्या ठिकाणी संवेदनशीलताही जपतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 07:44 AM
स्व. प्रतापराव भोसले यांच्या तत्त्वनिष्ठ जीवनकार्याचा ‘आधारवड’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : उल्हास पवार

स्व. प्रतापराव भोसले यांच्या तत्त्वनिष्ठ जीवनकार्याचा ‘आधारवड’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : उल्हास पवार

Follow Us
Follow Us:
  • ‘आधारवड’ हा गौरवग्रंथ म्हणजे मूल्यनिष्ठ राजकारणाचा वारसा
  • स्व. प्रतापराव भोसले यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी
  • उच्च शिक्षण पदवी देते; मात्र संस्कार देईलच असे नाही
वाई : तत्त्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, मैत्री आणि दिलेल्या शब्दाला जागण्याची वृत्ती ही स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. राजकारण आणि समाजकारणाचे रंग बदलत असताना भाऊंसारख्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा ‘आधारवड’ हा गौरवग्रंथ म्हणजे मूल्यनिष्ठ राजकारणाचा वारसा सांगणारा दस्तऐवज असून, तो नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा देईल, असे विधानपरिषदेचे माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितले.

जनता शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी खासदार स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या ‘आधारवड’या गौरवग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन उल्हासदादा पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय कुवळेकर होते. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले, संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्रा. नारायण चौधरी व प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उल्हास पवार म्हणाले, स्व. प्रतापराव भोसले यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. औपचारिक शिक्षण मर्यादित असले, तरी त्यांची आकलनशक्ती निष्णात वकिलालाही लाजवेल, अशी होती. मैत्री कशी निभावावी, दिलेला शब्द कसा पाळावा आणि पक्षाशी निष्ठा कशी जपावी, याचा आदर्श त्यांनी आपल्या आचरणातून घालून दिला. संसदेत असो वा सार्वजनिक जीवनात, त्यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांच्या जीवनातील मूल्ये आणि कार्यपद्धती आजही मार्गदर्शक आहेत. ‘आधारवड’ हा गौरवग्रंथ भाऊंच्या कार्याची पोहोच असून, त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा परिचय पुढील पिढीला करून देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरेल. हा ग्रंथ वाचकांना निश्चितच नवी प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर म्हणाले, स्व. प्रतापराव भोसले यांच्या राजकारणाचा काळ वेगळा होता. त्या काळात राजकीय विरोध असला, तरी तो प्रामुख्याने तात्त्विक स्वरूपाचा होता. आज राजकारण आणि समाजकारणाचे रंग बदलले आहेत, माणसांची रूपे बदलली आहेत. अशा परिस्थितीत भाऊंसारख्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. ‘तत्त्व आणि ‘तत्त्वनिष्ठा’ हे शब्द दुर्मिळ होत चाललेल्या काळात भाऊंच्या जीवनावर गौरवग्रंथ प्रकाशित होणे ही काळाची गरज आहे.

उच्च शिक्षण पदवी देते; मात्र संस्कार देईलच असे नाही. भाऊंची नाळ शेती आणि मातीशी जोडलेली होती. जो स्वच्छ असतो, तो परखड असतो; मात्र आवश्यक त्या ठिकाणी संवेदनशीलताही जपतो. परखडपणा आणि संवेदनशीलता यांचा सुंदर समन्वय भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात होता. स्वतःच्या कार्याचे श्रेय मिळविण्यासाठी धावपळ करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सकारात्मक आणि आनंददायी होती.
अडचणींपासून पलायन करण्याऐवजी त्यांना सामोरे जाण्याची वृत्ती त्यांच्यात होती. आजची राजकीय परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यातील पिढीला भाऊंसारखी व्यक्ती खरोखर होऊन गेली होती का, असा प्रश्न पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

भाऊ म्हणजे परिपूर्णतेचे अनेक पैलू एकत्रितपणे अनुभवायला देणारे व्यक्तिमत्त्व होते. ‘आधारवड’ हा ग्रंथ केवळ आठवणींचा संग्रह नसून मूल्यनिष्ठेचा परिपाक आहे. तत्त्वांची, विचारांची आणि तेजाची पेरणी करणारा हा ग्रंथ आहे. तो राज्यातील सर्व ग्रंथालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचविण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

भाऊंचे व्यक्तिमत्त्व शब्दांत मांडणे कठीण

जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, भाऊंचे व्यक्तिमत्त्व शब्दांत मांडणे कठीण असून, ते आकलनाच्या पलीकडचे होते. त्यांच्या मनात यशवंतराव चव्हाण साहेब आणि किसन वीर आबा यांच्याविषयी कायम कृतज्ञतेची भावना होती. हाती घेतलेले कार्य नेटाने आणि चिकाटीने पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जीवनकार्याचा दस्तऐवज साकारताना संपादकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. गौरवग्रंथाचे कार्यकारी संपादक प्रा. डॉ. शिवाजी कांबळे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले.

Karanja : तापमानाचा १३ हजार हेक्टर कपाशीला फटका; एकरी एक ते दीड क्विंटल उत्पन्नाचा अंदाज, खर्चही निघणे कठीण

Web Title: Principled life and work of late prataprao bhosale serve as aadharvad says ex mlc ulhas pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.