Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत खासगी बसवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरू; सध्या तिकीटाचे दर किती?

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात. खासगी बस ऑपरेटरांनी प्रवाशांकडून तब्बल दुप्पट–तिप्पट दर वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2025 | 02:45 PM
दिवाळीत खासगी बसवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरू; सध्या तिकीटाचे दर किती?

दिवाळीत खासगी बसवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरू; सध्या तिकीटाचे दर किती?

Follow Us
Close
Follow Us:
  • दिवाळीत खासगी बसवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरू
  • खासगी बसमध्ये जाण्यासाठी तिकीटाचे दर वाढले
  • दुप्पट–तिप्पट दर वसूल करण्यास सुरुवात

पुणे : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात. एसटी (राज्य परिवहन बस) आणि रेल्वेच्या तिकिटांची गर्दी आणि तिकीट मिळण्यात होणारा अडथळा यामुळे अनेकांना खासगी ट्रॅव्हल बसचा आधार घ्यावा लागत आहे. याच संधीचा फायदा घेत खासगी बस ऑपरेटरांनी प्रवाशांकडून तब्बल दुप्पट–तिप्पट दर वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे ते नांदेड या मार्गाचे भाडे १६०० ते १७०० रुपये इतके आकारले जात आहे, तर एसटी बसचे भाडे फक्त ८३० रुपये आहे. आकोल्यासाठी १९०० ते २००० रुपये, आकारले जात आहे. एसटी भाडे ८३० आहे. नागपूरसाठी २००० ते २२०० रुपये आकारले जात आहे. एसटीचे भाडे १२५२ इतके आहे. आणि लातूरसाठी १५०० ते २००० रुपये इतके दर आकारले जात आहेत. एसटीचे भाडे ५८० आहे. इतरही मार्गांवर अशीच दरवाढ करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भागांत मराठवाडा व विदर्भातील नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातून प्रवाशांची गर्दी वाढली असून, एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बससेवाही सुरू करण्यात आली आहे. तरीसुद्धा तिकिटांची कमतरता भासल्याने खासगी बसवाल्यांची चांदी झाली आहे. प्रवाशांनी शक्यतो एसटी बस किंवा रेल्वेचे तिकीट वेळेत आरक्षित करावे, अन्यथा मनमानी दरांचा फटका बसू शकतो, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

परिवहन बस     खाजगी बस

नांदेड ८३०         १६०० ते १७००

अकोला ८३०       १५०० ते १६००

नागपूर १२५२      २५०० ते २६००

बुलढाणा ६७०       १६०० ते १७००

सोलापूर ४५८         ११०० ते १२००

दीडपटीपेक्षा अधिक भाडे आकारू नये. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनी जादा भाडेदर आकारणीबाबत तक्रार करायची असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक व तिकिटाचा फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Web Title: Private bus operators are looting passengers during diwali festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • Train

संबंधित बातम्या

Diwali 2025: ‘दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…’; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन
1

Diwali 2025: ‘दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…’; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

Ayodhya Deepotsav 2025: कलियुगात पुन्हा उडणार पुष्पक विमान; अयोध्येचा दैदिप्यमान दीपोत्सव अजिबात नका चुकवू
2

Ayodhya Deepotsav 2025: कलियुगात पुन्हा उडणार पुष्पक विमान; अयोध्येचा दैदिप्यमान दीपोत्सव अजिबात नका चुकवू

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral
3

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral

Diwali 2025: दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते? जाणून घ्या काय आहे यामागील कारण
4

Diwali 2025: दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.