Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी बसला भीषण आग, बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

  • By Rahul Gupta
Updated On: Feb 07, 2024 | 02:37 PM
खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी बसला भीषण आग, बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
Follow Us
Close
Follow Us:

Ratnagiri Bus Fire : महाड नजीक एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने बुधवारी रात्री काही काळ हा भीषण बर्निंग बसचा थरार पहावयास मिळाला.याबाबत सविस्तर वृत्त असे रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मालकीची औदुंबर छाया ट्रॅव्हल्स ही कंपनी असून या कंपनीने गौरव चव्हाण यांच्या मालकीची भाडेतत्त्वावर घेतलेली एक प्रवासी बस (MH08E9779) बुधवार 7 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीहून मुंबईकडे निघाली होती. ती मध्यरात्री उशिरा 2.30 चे दरम्यान महाडच्या सावित्रीपुला जवळ आली असता तिच्या उजव्या बाजूचा मागील टायर फुटून टायरने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी करून प्रवाशांना झटपट खाली उतरवले तसेच बसमधील अग्निशमन यंत्रणेमार्फत आग विझवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला परंतु आगीचा जोर जास्त असल्या कारणाने तिने भीषण स्वरूप धारण केले.घटनेची माहिती मिळताच काही वेळातच महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या बसमध्ये 19 प्रवासी आणि चालकासहित ट्रॅव्हल कंपनीचे चार असे एकूण 22 जण प्रवास करीत होते. प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली.दरम्यान या बसमधील सर्व प्रवाशांना अन्य एका बसमधून सुखरूपरित्या मुंबई येथे रवाना करण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती बसचे चालक गुलहसन पठाण यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांमार्फत अधिक तपास सुरू आहे.समृद्धी महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांच्या घटनांचे उदाहरण समोर असताना आता मुंबई गोवा महामार्गाचे देखील काँक्रिटीकरण झाल्यामुळे येणाऱ्या कालावधीत अशा पद्धतीने टायर फुटीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत या दुर्घटनेनंतर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Private travels passenger bus caught fire bus gutted fortunately no casualties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 02:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.