Pro Kabaddi League 11 Delhi Dabangs Tie the Match with stormy Playing beat UP Yoddha 32-32 in PKL
पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सामन्यातील शेवटच्या चढाई मध्ये दिल्लीच्या नवीन कुमारने एक गडी बाद करीत संघाला ३२-३२ अशी बरोबरी साधून दिली. एक मिनिट बाकी असताना दिल्लीचा संघ दोन गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, आशु मलिक याने एका चढाईत दोन गडी टिपून बरोबरी साधली होती. त्याची पकड करताना युपी योद्धा संघाने केलेली चूक दिल्लीच्या पथ्यावर पडली.यूपी योद्धा संघाने येथील पहिल्या लढतीत काल तेलगू टायटन्स विरुद्ध शानदार विजय मिळवला होता.
दबंग दिल्ली आणि यूपी योद्धाची सुरुवातीपासूनच चुरस
दबंग दिल्ली व युपी योद्धा यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस होती. आठव्या मिनिटाला सात सात अशी बरोबरी होती मात्र नंतर युपी योद्धाने तीन गुणांची आघाडी घेतली खरी तथापि दिल्ली संघाने जोरदार चढाया करीत मध्यंतराला १३-१२ अशी नाममात्र आघाडी मिळवली. त्यावेळी दिल्ली संघाला यूपी संघावर लोण नोंदवण्यासाठी हुकमी संधी मिळाली होती. ही संधी उत्तरार्धात ते कसे पार पाडतात ही उत्सुकता होती.
हेही वाचा : IND VS AUS : पहिल्या कसोटीचा स्टार्कने यशस्वी जयस्वालकडून घेतला बदला, टीम इंडियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये
उत्तरार्धात पहिल्याच चढाईत यूपी योद्धाच्या भरत याने एक गुण मिळवीत १३-१३ अशी बरोबरी केली खरी मात्र त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला कारण दिल्लीच्या नवीन कुमार याने पुढच्या चढाईत दोन गडी बाद करीत यूपी संघावर लोण चढविला. लोण नोंदवल्यानंतर दिल्ली संघाने खेळावर आपले नियंत्रण ठेवले होते युपी योद्धा संघाच्या खेळाडूंनी ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सहा मिनिटे बाकी असताना त्यांनी दिल्ली संघावर लोण चढविला आणि पुन्हा आघाडी मिळविली. पाच मिनिटे बाकी असताना यूपी योद्धा संघ २८-२५ असा आघाडीवर होता. दिल्ली संघाकडून आशू मलिक व नवीन कुमार यांनी अनुक्रमे ११ व ८ आठ गुण नोंदविले. यूपी संघाकडून गगन गौडा (१३ गुण), व भवानी रजपूत (१० गुण) यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
हेही वाचा : मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघ गडगडला; स्वतःच्या नावावर 6 विकट; नवीन रेकॉर्डची नोंद