फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
ॲडलेड कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला आले. यशस्वी सामन्याच्या पहिल्या चेंडूला सामोरे जाण्यासाठी सज्ज. दुसरीकडे मिचेल स्टार्कच्या हातात नवा चेंडू. धाव घेत असताना, स्टार्कने पहिला चेंडू लेग-स्टंप लाईनवर टाकला, जो स्विंग झाला आणि सरळ पॅडला लागला. यशस्वी ओळ झाकण्याचा प्रयत्न करत होता, पण तो पूर्णपणे चुकला. आता यशस्वीकडे परतण्याशिवाय पर्याय नव्हता. चेहरा लटकलेला आणि दुखी मनाने यशस्वी ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतला.
या विकेटसह स्टार्कने मागील सामन्याचा बदला पूर्ण केला. वास्तविक, पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात फलंदाजी करताना यशस्वीने त्याला स्लेजिंग केले होते. मात्र, त्यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज हसला. दुसऱ्या डावात 161 धावा करणाऱ्या यशस्वीने ‘बॉल खूप हळू येत आहे’ असे म्हणत स्टार्कला टोमणे मारले, ज्याला वेगवान गोलंदाजाने त्याला बाद करून प्रत्युत्तर दिले.
WHAT A BALL FROM STARC TO GET JAISWAL IN THE FIRST BALL 🤯 pic.twitter.com/ExpD9wJihI
— Johns. (@CricCrazyJohns) December 6, 2024
जसप्रीत बुमराहसह हे दिग्गज खेळाडू साजरा करणार 6 डिसेंबर रोजी वाढदिवस
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामन्याची पहिली इनिंग सुरु आहे यामध्ये भारताचा संघ फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाने पहिला विकेट पहिल्या चेंडूत गमावला आहे. केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केल्यानंतर भारताचा डाव गडगडला. पहिल्या सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांत संघाने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या. सेटचे दोन्ही फलंदाज बाद झाले. आता भारताच्या संघाने २८ ओव्हरमध्ये ९८ धावा करत ५ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये यशस्वी जयस्वालने एकही धाव न करता स्टार्कने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर केएल राहुलने संघासाठी ३७ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने फक्त फक्त ७ धावा केल्या. तर शुभमन गिलने संघासाठी ३१ धावा करून विकेट गमावली तर पुन्हा एकदा रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.
भारताच्या संघाकडे मालिकेमध्ये आघाडी आहे पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिप फायनल मध्ये जागा पक्की करण्यासाठी टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारताचा संघाला कमीतकमी ४ सामने जिंकायचे आहेत. सध्या भारताचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पहिल्या स्थानावर आहे परंतु अजुनपर्यत टीम इंडियाचे फायनलचे स्थान पक्के झाले नाही. त्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. कारण भारताच्या संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडने एकतर्फी मालिकेत विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.