Proposal for recruitment of 67 employees Adhantari, vacancies to fire brigade
गोंदिया : आणीबाणीच्या स्थितीत महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी ६७ पदांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र, विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून, याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर येत आहे.
[read_also content=”आय लाईक डेथ, असे म्हणत मृत्यूनंतरच्या जगाच्या आकर्षणापोटी, त्या १३ वर्षीय मुलीने केली गळफास घेऊन आत्महत्या https://www.navarashtra.com/maharashtra/13-year-old-girl-commits-suicide-by-hanging-herself-at-home-attraction-of-life-after-death-nraa-264600.html”]
कुठेही आग लागल्याची घटना घडल्यास सर्वप्रथम आठवण येते ती अग्निशमन वाहनाची. शिवाय आणिबाणीच्या परिस्थितीतही अग्निशमन विभाग धावून येतो. यावरून अग्निशमन विभागाचे महत्व लक्षात येते. म्हणूनच अग्निशमन विभागाला पाहिजे त्या सुविधा पुरविणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. अग्निशमन विभाग परिपूर्ण असल्यास त्याचा फायदा जनतेलाच मिळतो. मात्र खेदाची बाब अशी की, येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विभागातील काही मुख्य पदांचाच विचार केल्यास तिही पूर्णपणे भरलेली नसल्याचे दिसत आहे. शिवाय गोंदिया पालिकेकडे असलेल्या अग्नीशमन विभागातील कर्मचाऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून भरती झाली नाही. त्यामुळे, या विभागात असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विभागात काम करण्याकरिता हवी असलेली लकब नसल्यामुळे मोठी पंचाईत होते.
[read_also content=”चक्क महिला न्यायाधीशांच्या घरीच चोरटयांनी केली चोरी, दागिन्यांसह ३ लाखांचा ऐवज लंपास https://www.navarashtra.com/maharashtra/thieves-broke-into-the-house-of-a-woman-judge-and-stole-rs-3-lakh-along-with-jewelery-nraa-264500.html”]
त्यामानाने जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पात असलेल्या अग्निशमन विभागात अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असून त्यांना हाताळण्याचे तंत्रज्ञान देखील कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध आहे. चार वर्षांपूर्वी शहराच्या मध्यभागी असलेल्या गोरेलाल चौकात एका हॉटेलला आग लागली होती. त्यात अनेकांचा जीव देखील गेला होता. त्यावेळी तिरोडा येथून बोलावण्यात आलेल्या अग्नीशमन विभागाने जी कार्य तत्परता दाखविली होती. ती पालिकेच्या अग्नीशमन विभागाकडे नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली होती. पालिकेने नुकतेच दोन अत्याधुनिक अग्नीशमन वाहने विकत घेतले आहेत. मात्र, रिक्त पदांचा भरणा असल्यामुळे हे विभाग पंगू झाल्यासारखे आहे. शासनाने पदभरती केल्यास त्याचा उपयोग शहर आणि गोंदिया जिल्ह्याला देखील नक्कीच होणार आहे.
[read_also content=”लग्नाच्या १२ व्या दिवशी त्या युवकावर काळाचा घाला, भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/on-the-12th-day-of-the-marriage-the-young-man-was-killed-in-a-tragic-accident-nraa-264473.html”]
६७ पदांच्या भरतीची मागणी
विभागातील या रिक्त पदांमुळे एकतर सेवेवर परिणाम पडतो. शिवाय विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शासनाकडून सुधारीत प्रस्ताव मागविण्यात आला. त्यात अग्निशमन विभागाने तीन पाळ्यांकरिता ६७ पदांची मागणी केली आहे.
कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांवर भिस्त
अग्निशमन विभागातील मुख्य काही पदांचीच पाहणी केल्यास आजघडीला लिडींग फायरमनची दोन पदे मंजूर असून त्यातील एक पद रिक्त आहे. वाहन चालक-ऑपरेटरची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे रिक्त आहेत. फायरमनची सहा पदे रिक्त असून एक पद रिक्त आहे. अशाप्रकारे १२ पैकी चार पदे रिक्त आहे. त्यामुळे विभागात सध्या ७ वाहनचालक कंत्राटी तत्वावर कार्यरत असून १२ फायरमन रोजंदारीने काम करीत आहेत.