
मुंबई : राज्याला मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान (Big Loss) झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची (Immediate Relief) गरज आहे. पुणे (Pune), सातारा (Satara), रायगड (Raigad), नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य (Heavy Rain) पावसामुळे नुकसान झाले आहे. या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या भागाची मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.