Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी भाषा वाचवण्यासाठी मुंबईमध्ये आज जाहीरसभा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात समन्वय समिती स्थापन झाली आहे. २९ जूनच्या जाहीर सभेत सरकारच्या अन्याय्य शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 29, 2025 | 09:00 AM
मराठी भाषा वाचवण्यासाठी मुंबईमध्ये आज जाहीरसभा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

मराठी भाषा वाचवण्यासाठी मुंबईमध्ये आज जाहीरसभा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीच्या वतीने २९ जून रोजी दुपारी ३ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समितीने विशेष निमंत्रण पाठवले आहे.

‘मातोश्री’वर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या सभेची घोषणा केली होती. या सभेला उद्धव ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे डॉ. अजित नवले, भाकपचे प्रकाश रेड्डी, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे आदी उपस्थित राहतील.

सक्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव

शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात समन्वय समिती स्थापन झाली आहे. २९ जूनच्या जाहीर सभेत सरकारच्या अन्याय्य शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली जाईल. पत्रात शिंदे यांना सभेला उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती करण्यात आली असून, त्यांच्या पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. ही सभा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, यातून सरकारवर तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिंदी भाषेच्या निर्णयाला तूर्त स्थगिती

महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत सर्वच शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, मराठी भाषेची अस्मिता धोक्यात येणार असल्यामुळे राज्य सरकार सर्वच स्तरातून टीका होत होती. अखेर वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे.

Web Title: Public meeting in mumbai today to save marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • Hindi Language
  • Maharashtra Schools
  • Marathi language Compulsory

संबंधित बातम्या

Hindi Diwas 2025 : हिंदी राष्ट्रभाषा की अधिकृत भाषा? गोंधळ दूर करण्यासाठी जाणून घ्या संविधानातील ‘हे’ महत्वाचे मुद्दे
1

Hindi Diwas 2025 : हिंदी राष्ट्रभाषा की अधिकृत भाषा? गोंधळ दूर करण्यासाठी जाणून घ्या संविधानातील ‘हे’ महत्वाचे मुद्दे

Hindi Day 2025 : 14 सप्टेंबरला का साजरा करतात हिंदी दिवस? काय आहे यामागचं कारण ?
2

Hindi Day 2025 : 14 सप्टेंबरला का साजरा करतात हिंदी दिवस? काय आहे यामागचं कारण ?

हीच ती श्रीमंतांची शाळा! फीज इतके महाग की मुंबई-पुण्यात घ्याल फ्लॅट, ४ विद्यार्थ्यांमागे येथे १ शिक्षक
3

हीच ती श्रीमंतांची शाळा! फीज इतके महाग की मुंबई-पुण्यात घ्याल फ्लॅट, ४ विद्यार्थ्यांमागे येथे १ शिक्षक

‘बोलणार नाही, हे चालणार नाही’; मराठी भाषेवरून अजित पवारांचं हिंदी भाषिकांसदर्भात मोठं विधान
4

‘बोलणार नाही, हे चालणार नाही’; मराठी भाषेवरून अजित पवारांचं हिंदी भाषिकांसदर्भात मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.