Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचा जलवा; व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा!

लक्ष्मी रस्त्यावर गणेशोत्सवाच्या जल्लोषात एका वेगळ्याच ‘मुंढे स्टाइल’ पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गणपती रथावर तुकाराम मुंढेंचे व्यंगचित्र आणि त्याखालील संदेश पाहून गणेशभक्तांमध्येही त्याची चर्चा रंगली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 15, 2026 | 04:13 PM
Pune News: गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचा जलवा; व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा!

Pune News: गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचा जलवा; व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा!

Follow Us
Follow Us:
  • गणपती रथावर तुकाराम मुंढेंचे व्यंगचित्र; भेसळीविरोधात जनजागृती
  • ‘श्रींच्या नैवेद्यात अजिबात भेसळ चालणार नाही’चा संदेश
  • शुद्ध व सुरक्षित नैवेद्याबाबत गणेशभक्तांना जागरूक करण्याचा प्रयत्न
पुणे: गणेशोत्सवाची धामधूम सुरू होताच लक्ष्मी रस्त्यावर यंदा एका वेगळ्या सामाजिक संदेशाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाने आपल्या गणपती रथाच्या सजावटीत अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) प्रमुख तुकाराम मुंढे यांचे व्यंगचित्र लावले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून गणरायाच्या नैवेद्यापासून खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. गणेशोत्सवात गणरायाला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. यासाठी मिठाई, मोदक, दूध, खवा, पनीर यांसह विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने त्यांची गुणवत्ता आणि भेसळीचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. याच पार्श्वभूमीवर वीर हनुमान मित्र मंडळाने आपल्या गणपती रथावर भेसळीविरोधातील संदेश देणारे व्यंगचित्र लावले आहे.

हेही वाचा:Pune News: केंद्रीय मंत्री मोहोळांच्या सुरक्षा ताफ्याला भरधाव दुचाकीचा कट; ३२ वर्षीय दुचाकीस्वारावर गुन्हा

‘श्रींच्या नैवेद्यात भेसळ अजिबात चालणार नाही’

रथावरील मोठ्या व्यंगचित्रात तुकाराम मुंढे यांच्या हातात भिंग दाखवण्यात आले असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचा संदेश त्यातून देण्यात आला आहे. या पोस्टरवर ‘मला श्रींच्या नैवेद्यातही अजिबात भेसळ चालणार नाही’ असा ठळक संदेश देण्यात आला आहे. गणरायाच्या नैवेद्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे, असा या संदेशाचा उद्देश आहे.

मुंढेंच्या कारवाईची चर्चाही

गेल्या काही काळापासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांमधील भेसळ तसेच मुदतबाह्य आणि बनावट औषधांविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील सजावटीतून त्यांच्या कामाचा संदर्भ देत सामाजिक संदेश देण्याचा मंडळाने प्रयत्न केला आहे.

हेही वाचा:Sangali Crime: वडिलांच्या मारहाणीचा राग; जुन्या वादातून सांगलीत २९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

गणेशोत्सवातून सामाजिक संदेश

वीर हनुमान मित्र मंडळाने गणपती रथाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहणे, खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासणे आणि गणरायाला शुद्ध व सुरक्षित नैवेद्य अर्पण करणे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरचा हा गणपती रथ आणि त्यावरील तुकाराम मुंढेंचे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: Pune ganeshotsav tukaram mundhe poster food adulteration message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.