Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar School Corruption: ‘मॉडेल स्कूल’च्या नावाने लाखोंची लूट? सोनोरीत जुन्याच इमारतीवर बांधल्या दोन खोल्या!

शाळेच्या बांधकामासाठी एक कोटी २ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधील जवळपास ३० टक्के म्हणजे २० लाख रुपये विविध करांच्या माध्यमातून कट झाले आहेत. तर प्रत्यक्षात ७८ ते ८० लाखांचे काम करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 18, 2026 | 04:47 PM
Purandar News, Sonori School Scam,

Purandar News, Sonori School Scam,

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील मॉडेल स्कूल बांधकामात लाखोंच्या भ्रष्टाचाराचा आरोप
  • वर्गखोल्यांसाठी ४८.३६ लाख आणि दुरुस्तीसाठी ३०.५१ लाख रुपयांचा निधी मंजूर
  • सुधीर कातोरे यांच्याकडून नितीन काळे यास पोट-ठेका दिला गेल्याची अधिकाऱ्यांची माहिती
संभाजी महामुनी, Purandar News: पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची शासनाच्या मॉडेल स्कूल उपक्रमात निवड झाली असून शाळेच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला, मात्र ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून पूर्वीच्याच शाळेच्या इमारतीवर दोन वर्गखोल्यांचे बांधकाम केले करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सोनोरी मधील ग्रामस्थांनी केला आहे.

सोनोरी गावच्या शाळेची शासनाच्या मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत निवड झाली असून या माध्यमातून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देतानाच दर्जेदार शाळा दिसण्यासाठी नव्याने बांधकाम करून देण्यात येत आहे. शाळेच्या दोन वर्गखोल्या मंजूर झाल्या असून शाळेचा परिसर विकसित करण्यात येत आहे. वर्गखोल्यांसाठी ४८ लाख ३६ हजार ९८८ रुपये तर शाळा दुरुस्तीसाठी ३० लाख ५१ हजार २९१ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुधीर कातोरे या ठेकेदारास कामाचा ठेका दिला आहे. तर कातोरे याने हेच बांधकाम सोनोरीतील स्थानिक ठेकेदार नितीन काळे यास पोट ठेकेदार म्हणून काम दिले आहे. अशी माहिती पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उप अभियंता संतोष नलावडे यांनी दिली.

दरम्यान सोनोरी मध्ये दोन वर्षापूर्वीच विविध कंपन्यांनी त्यांच्या सीआरएस फंडातून शाळेला दर्जेदार संपूर्ण इमारत बांधून शाळेला संरक्षण भिंत तसेच रंगरंगोटी, स्वतंत्र स्वच्छतागृह करून दिलेली आहे. त्यामुळे शाळेची गरज पूर्ण झाली आहे. मात्र ठेकेदार नितीन काळे याने पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तीन ते चार वर्षापूर्वी बांधलेल्या शाळेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर दोन खोल्यांचे बांधकाम केले. आणि दोन खोल्यांच्या बदल्यात तब्बल ४८ लाखांच्या निधी चा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी आरोप आरपीआय ( आठवले ) तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केला आहे.

वास्तविक मध्ये तीन, चार वर्षापूर्वी शाळेचे बांधकाम केले असून शाळेत फारशी, वाटरप्रूफिंग, रंगकाम, खिडक्या, दरवाजे शाळेला स्टेज असे संपूर्ण काम केले आहे. त्यावर आता जीना, त्यावर लोखंडी ग्रील, संरक्षण भिंतीवर स्टीलचे रेलिंग, स्टेजवर पत्रा अशा किरकोळ कामासाठी तब्बल ३० लक्ष ५१ हजार २९१ रुपयांचा निधी खर्च दाखविला आहे. दोन्ही वर्ग खोल्या आणि इतर कामासाठी फार तर १५ ते २० लक्ष रुपये पुरेसे आहेत. मात्र तब्बल ८० लाखांचा निधी खर्च दाखवला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला असल्याचे बळीराम सोनवणे यांनी सांगितले आहे.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह

शाळेच्या बांधकामासाठी एक कोटी २ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधील जवळपास ३० टक्के म्हणजे २० लाख रुपये विविध करांच्या माध्यमातून कट झाले आहेत. तर प्रत्यक्षात ७८ ते ८० लाखांचे काम करण्यात आले आहे. आतापर्यंत २२ अख रुपये ठेकेदाराला देण्यात आले असून अद्याप पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही. काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे काम पाहून देण्यात येतील. असे पुरंदर पंचायत समितीचे बांधकाम उप अभियंता संतोष नलावडे यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना पुरंदरचे आरपीआयचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे म्हणाले की, केलेले एकूण काम १५ ते २० लाखांचे असून उर्वरित पैशांचा भ्रष्टाचार आहे. तसेच अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला कामाचे पूर्ण पैसे दिले असून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केवळ पूर्णत्वाचा दाखला दिलेला नसावा. अधिकारी आणि ठेकेदार आमच्याशी पूर्ण माहिती न देता अरेरावीची भाषा करीत आहेत. यांच्यावर कारवाई होण्यासाठी जीपचे मुख्य कार्यकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार.

 

 

Web Title: Pune newspurandar sonori model school construction corruption allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Purandar

संबंधित बातम्या

Purandar Load Shedding: पुरंदरच्या वाड्या-वस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य! ‘इमर्जन्सी’ लोडशेडिंगमुळे टॉर्चच्या उजेडात अभ्यास
1

Purandar Load Shedding: पुरंदरच्या वाड्या-वस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य! ‘इमर्जन्सी’ लोडशेडिंगमुळे टॉर्चच्या उजेडात अभ्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.