पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यातील माळशिरसमध्ये प्रेमातून सूड उफाळला. प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून तिच्या प्रियकराने नवऱ्याला कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. नवविवाहित दीपक जगतापचा मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे.
पुरंदर तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्यात रस्ते हेच लक्षात येईना. वाहन चालकांना तर अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत.
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडीपासून नीरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर होर्डिंग वर्षानुवर्षे उभे असून, यापूर्वी विविध अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
Purandar News: जमीनीची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांचे गट करून त्यांच्याशी मागणी व मोबदला याबाबत चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन असून, २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत.
काँग्रेसमध्ये पूर्वीप्रमाणे संवाद राहिला नाही आणि जिथे संवाद नसतो तिथे छोटे कुटुंब होते. केवळ पारिवारिक संवाद राहिले आणि इतर बाबतीत विसंवाद राहिले आणि त्यामुळे पक्षावर पराभवाची वेळ आली.
भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला असून पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे.
पुरंदर तालुका प्रशासनाकडे तालुक्यातील दिव्यांगांची संख्याच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशासनाच्या कारभारावर प्रहार संघटनेने प्रश्न उपस्थित केला आहे.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप अत्यल्प होते. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणी पातळी खूप खालावलेली होती. खरीप प्रमाणेच रब्बी हंगाम वायाला जाण्याची भीती होती.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील सुमारे २८३२ हेक्टर क्षेत्र विमानतळ प्रकल्प साठी संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येणार असून यासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन पुणे येथे पार पडली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार, पुणे – पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुरंदर विमानतळावरुन वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावात बैठकांचा धडाका सूर करण्यात आला आहे. स्थानिकांनी मात्र प्रशासनाच्या या प्रयत्नांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.