
Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात स्पोर्ट्स पोर्शे कारचा 19 मे रोजी मोठा अपघात झाला होता. आता या पुणे अपघातामधील आरोपी असलेला वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे त्याने आपल्या इन्स्टावरून अपघात झाल्यावर रात्री एक रॅप साँग गायलं होतं. यामध्ये त्याने शिवीगाळ करीत हो मी आहे बिल्डरचा पोरगा मिळाला मला जामीन असं बोलत आहे.
15 तासांच्या आत मिळाला जामीन
कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षाच्या मुलाने स्पोर्ट कार पोर्शची दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेच्या 15 तासांत काही अटी व शर्तींवर त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर या प्रकरणाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. कारण यामध्ये दोन निष्पाप तरुण-तरुणींचा मृत्यू झाला होता.
वेदांत अग्रवाल याचा रॅप सॉंग व्हिडीओ व्हायरल
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वेदांत अग्रवाल हा रॅप साँग गायलं असून तो लोकांना शिव्या देत आहे. दोन जीवांना संपवलं तरीही या रईस बापाच्या औलादीचा माज काही उतरलेला दिसत नाही. या रॅप साँगमधून तो हो मी आहे बिल्डरचा पोरगा म्हणून सुटलोय, असं म्हणत त्यानंतर रॅपमधून अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियालवर हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
परत एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा
व्हिडीओमध्ये वेदांत अग्रवाल हा परत एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे. वेदांत याला त्याने केलेल्या कृत्याचा जरासाही पश्चाताप नसल्याचं दिसत आहे. कारण व्हिडीओमध्ये हा चक्क शिवीगाळ करत आहे. अपघात घडल्यावर ज्या रात्री त्याला जामीन मिळाला त्यानंतर त्याने हाे रॅप साँग गायलं होतं. पोलिसांनी या अपघात प्रकरणात वेदांतवर 304 गुन्हा दाखल केला आहे. आता तो १४ दिवस बाल कारागृहात असून पोलिसांनी त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतलं आहे.