Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunal Kamra Controversy: ‘बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए’ म्हणत पुण्यातून कुणाल कामराला जशास तसे उत्तर

कुणाल कामराने त्याच्या एका कॉमेडी शो दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता एका गाण्याद्वारे त्यांच्यावर टीका केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 04, 2025 | 04:09 PM
Kunal Kamra Controversy: ‘बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए’ म्हणत पुण्यातून कुणाल कामराला जशास तसे उत्तर
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कामराच्याच शैलीत काव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक टिळक रस्त्यावर झळकला आहे. रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ असे व्यंगचित्र असलेला हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए !’ अशा शब्दांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला  आहे.

युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकुर डायनिंग हॉलसमोर लावला आहे. ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ गाण्यांच्या ओळी लिहीत ‘शेर नजर वो आए’ असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला. हिंदुत्वाचा कैवारी, चिपळूणचा महापूर, इर्शाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते, असे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे.

Jaykumar Gore News: ‘महिलेच्या आडून मला संपवण्याचा कट…’; जयकुमार गोरेंच्या दाव्याने

या संदर्भात वैभव वाघ म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा, योजना देण्याचे काम त्यांनी केले. लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून लाखो गोरगरिबांना सेवा दिली. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, हिंदुत्वासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने केलेले बदनामीकारक वक्तव्य संतापजनक आहे. कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे. कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये. सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.”

काय आहे कुणाल कामराचं प्रकरण?

एका कार्यक्रमात विनोदी कलाकार कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. या गाण्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले दोन गट यावर भाष्य करण्यात आलं होतं.

4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा पृष्ठभाग कसा होता? थरथरणाऱ्या पृथ्वीने उघड केली गूढ रहस्ये

गाण्यात तो म्हणतो, “आधी शिवसेना भाजपमधून बाहेर आली, मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. एका मतदाराला 9 पर्याय दिले गेले, त्यामुळे सगळे गोंधळले.”या गाण्यातील ओळी – ‘ठाणे की रिक्षा, चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा… मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये…’ – अशा असून त्यात एकनाथ शिंदे यांचं नाव थेट घेतलेलं नसलं, तरी संकेत स्पष्टपणे त्यांच्याकडे आहे

 

 

Web Title: Pune responds to kunal kamra by saying let the speaker keep speaking he will do the work nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Kunal Kamra Controversy

संबंधित बातम्या

अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं
1

अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?
2

कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?

कुणाल कामराने शोमध्ये आलेल्या चाहत्याला दिली जबरदस्त ऑफर; कॉमेडियन नेमकं काय म्हणाला ?
3

कुणाल कामराने शोमध्ये आलेल्या चाहत्याला दिली जबरदस्त ऑफर; कॉमेडियन नेमकं काय म्हणाला ?

Kunal Kamra X Post: ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी?’ कुणाल कामराची आणखी एक पोस्ट व्हायरल
4

Kunal Kamra X Post: ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी?’ कुणाल कामराची आणखी एक पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.