
बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ९,७३५ न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये १ कोटी ९६ लाख ७१ हजार ३७ रूपये रकमेची तडजोड यावेळी करण्यात आली.
राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती दरेकर, न्या. भालेराव, न्या. शेख, न्या. लोखंडे, न्या. राठोड, न्या. भरणे, न्या. आरबाड, न्या. कांबळे , न्या. गिरी, रणधीर, न्या. जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. लोकअदालतीमध्ये एकूण ९७३५ प्रकरणे निकाली निघाली. एक कोटी ९६ लाख ७१ हजार ३७ रुपये एवढ्या रकमेची प्रकरणे तडजोड अंती निकाली निघाली. तसेच प्रीलिटीगेशन न्यायालयीन केसेसमध्ये बँक कर्ज वसुली केसेस तसेच विज बील महसूल प्रकरणे अशा सर्व मिळून ६ हजार ४५९ एवढी प्रकरणे निकाली निघाली. या प्रकरणांमध्ये दोन कोटी ९४ लाख १९ हजार ८७१ एवढ्या जखमेचे तडजोडी झाल्या.
या लोकअदालतीत बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बी डी कोकरे, उपाध्यक्ष ॲड. अजित शेेरकर, उपाध्यक्ष ॲड.राजकिरण शिंदे ,सचिव ॲड.संदीप पाटील खजिनदार ॲड ऋषिकेश निलाखे, सहसचिव ॲड सोहेल शेख, महिला प्रतिनिधी म्हणून उषा मॅडम उपस्थित होत्या.