Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डीजेच्या दणदणाटामागे जुन्या वाहनांचा धोकादायक खेळ? आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष

डीजे वाहन तयार करताना वाहनाच्या मूळ रचनेत बदल केले जात असल्याचे दिसून येते. काही वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक ध्वनिक्षेपक, जनरेटर, लोखंडी फ्रेम तसेच इतर साहित्य बसवल्याने वाहनाचे वजन आणि आकार वाढतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2026 | 12:02 PM
डीजेच्या दणदणाटामागे जुन्या वाहनांचा धोकादायक खेळ? आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष

डीजेच्या दणदणाटामागे जुन्या वाहनांचा धोकादायक खेळ? आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : गणेशोत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा दणदणाट वाढत असतानाच, या डीजे वाहनांच्या तांत्रिक सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून जुनाट व वापरातून बाद होण्याच्या स्थितीतील वाहने स्वस्तात खरेदी करून त्यांच्यावर मोठमोठे स्पीकर, जनरेटर आणि लोखंडी सांगाडे बसवून त्यांचा’डीजे वाहन म्हणून वापर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा वाहनांची आरटीओ व वाहतूक पोलिसांनी सखोल तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जुने वाहन, नवी सजावट आणि वाढलेले वजन

डीजे वाहन तयार करताना वाहनाच्या मूळ रचनेत बदल केले जात असल्याचे दिसून येते. काही वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक ध्वनिक्षेपक, जनरेटर, लोखंडी फ्रेम तसेच इतर साहित्य बसवल्याने वाहनाचे वजन आणि आकार वाढतो. अशा बदलांना आवश्यक परवानगी घेतली आहे का, त्यांची आरसीमध्ये नोंद आहे का आणि वाहनाची तांत्रिक तपासणी झाली आहे का? याची पडताळणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कायदेशीर जबाबदारी कोणाची?

विशेष म्हणजे काही जुन्या वाहनांची नोंदणी मुदत संपलेली असण्याची शक्यता असून, त्यांचा फिटनेस आणि विमा वैध आहे की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सार्वजनिक रस्त्यावर अशा वाहनांचा वापर होत असल्यास एखादी दुर्घटना घडल्यास त्याची कायदेशीर जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

आवश्यक कागदपत्रे तपासण्याची मागणी

मिरवणुकीच्या काळात डीजे वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने संबंधित यंत्रणांनी केवळ ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळी तपासण्यापुरते मर्यादित न राहता वाहनाची संपूर्ण तांत्रिक स्थिती तपासावी, अशी मागणी होत आहे. वाहनाचे आरसी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, आवश्यक परवानग्या आणि वाहनाच्या मूळ रचनेत करण्यात आलेले बदल यांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

असुरक्षित वाहने आढळल्यास नियमानुसार कारवाई व्हावी

नियमांचे उल्लंघन करणारी किंवा तांत्रिकदृष्ट्या असुरक्षित वाहने आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी. उत्सवाचा जल्लोष सुरक्षिततेच्या किमतीवर होऊ नये, यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी डीजे वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका ! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

Web Title: A dangerous game involving old vehicles amidst the deafening dj music

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 12:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.