Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress-Shivsena Politics: काँग्रेसला पुन्हा धक्का! धंगेकरांपाठोपाठ आणखी एक बडा नेता शिंदे शिवसेनेच्या गळाला

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 10, 2025 | 11:28 AM
Congress-Shivsena Politics: काँग्रेसला पुन्हा धक्का! धंगेकरांपाठोपाठ आणखी एक बडा नेता शिंदे शिवसेनेच्या गळाला
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर, आता काँग्रेसमधील आणखी एक बडा नेता भाऊराव पाटील गोरेगावकर हेही शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ते हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या पक्षांतरामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. आधीच महायुती आणि महाआघाडी यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरू असताना, काँग्रेसला लागलेली  गळती पक्षासाठी अडचणीची ठरणार आहे.

महायुती विरुद्ध महाआघाडी 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना समाविष्ट करून पक्ष वाढवण्याची रणनीती दिसत आहे. तर काँग्रेसकडेही पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान आहे. रविंद्र धंगेकर यांच्यानंतर भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या पक्षत्यागाने काँग्रेसची आणखी अडचण वाढली असून, यानंतरही काँग्रेसमधून आणखी मोठे राजकीय फेरबदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ravindra Dhangekar Leave congress: मोठी बातमी! पुण्यात काँग्रेसच्या गडाला सुरूंग; रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार

भाऊराव पाटील गोरेगावकर शिंदे गटात प्रवेश करणार

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणारे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत ते हजारो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बंडखोरीनंतरही पराभव – शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि लक्षावधी मते घेतली होती. मात्र, पराभवानंतर त्यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Dream Science: स्वप्नात स्वतःला होळी खेळताना पाहणे शुभ की अशुभ

महायुती आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस व इतर पक्षातील बंडखोर नेत्यांना आपल्या गटात सामील करून घेत मजबूत होत आहे. रविंद्र धंगेकर यांच्यानंतर आता भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या जाण्याने काँग्रेससाठी आणखी अडचण निर्माण होणार आहे. यामुळे काँग्रेसमधून आणखी नेते बाहेर पडणार का? आणि आगामी निवडणुकीत याचा किती मोठा परिणाम होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रवींद्र धंगेकरांचाही काँग्रेसला रामराम

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अखेर त्यांनी  आज माध्यमांसमोर येत काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तसेच आज सायंकाळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला अधिकृत निर्णय जाहीर करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: After dhangekar another big leader shinde joins shiv sena nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Congress Politics

संबंधित बातम्या

‘आमचा डीएनए काँग्रेसचा, पक्ष कधीच सोडणार नाही’; कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार
1

‘आमचा डीएनए काँग्रेसचा, पक्ष कधीच सोडणार नाही’; कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार

Maharashtra Politics : विदर्भात काँग्रेसला उभारी मिळणार; ‘या’ नेत्यांना दिली गेली महत्त्वपूर्ण जबाबदारी
2

Maharashtra Politics : विदर्भात काँग्रेसला उभारी मिळणार; ‘या’ नेत्यांना दिली गेली महत्त्वपूर्ण जबाबदारी

Congress Politics: जालन्यात काँग्रेसचा गड ढासळला! वरपुडकर यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला
3

Congress Politics: जालन्यात काँग्रेसचा गड ढासळला! वरपुडकर यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला

Assembly Monsoon Session 2025: विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशीच नाना पटोले निलंबित; नेमकं झालं काय?
4

Assembly Monsoon Session 2025: विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशीच नाना पटोले निलंबित; नेमकं झालं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.