Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! महाकुंभसाठी पुण्यातून विमानसेवा सुरू; ‘या’ एअरलाईन्सने दिली माहिती; कसे आहे वेळापत्रक?

Akasa Airlines: महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. देशभरासह परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 30, 2025 | 01:53 PM
खुशखबर! महाकुंभसाठी पुण्यातून विमानसेवा सुरू; ‘या’ एअरलाईन्सने दिली माहिती; कसे आहे वेळापत्रक?
Follow Us
Follow Us:

पुणे:  लाेहगाव विमानतळावरून आता प्रयागराजसाठी विमान सेवा सुरु झाली आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीसाठीच ही सेवा असुन, ‘अकासा एअर’ या कंपनीमार्फत दिली जाणार आहे. प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची आरक्षणे पूर्ण झाल्याने अनेक नागरिक विमानांचा पर्याय निवडत आहेत. पुण्यावरून प्रयागराज येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा नव्हती.

मात्र, आता ‘अकासा एअर’ कंपनीने मंगळवारपासून  एक महिना दररोज लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रयागराजसाठी विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, लोहगाव विमानतळावरून थेट प्रयागराजला न जाता पुणे ते दिल्ली आणि त्यानंतर प्रयागराज असा दोन टप्प्यांत प्रवास करावा लागणार आहे.
महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. देशभरासह परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या आणि भाविकांच्या मागणीनुसार पुणे ते प्रयागराज ही अतिरिक्त विमान उड्डाण सेवा सुरू करीत आहोत, असे अकासा एअरलाइन्सचे मुख्य वाणिज्य अधिकारी प्रवीण अय्यर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कसे आहे वेळापत्रक?

पुणे ते प्रयागराज विमान सकाळी ७.३० वाजता पुण्यातून उड्डाण करेल आणि ९.४५ वाजता दिल्ली येथे पोहोचेल, तर दिल्लीवरून १०.५० वाजता प्रयागराजच्या दिशेने उड्डाण करत १२.१५ मिनिटांनी प्रयागराज विमानतळावर पोहोचेल. परतीसाठी विमान प्रयागराज येथून दुपारी १२:०५ वाजता उड्डाण करेल आणि दुपारी २.२० मिनिटांनी दिल्ली विमानतळावर पोहोचेल. दिल्ली विमानतळावरून दुपारी ३.०० वाजता पुण्याच्या दिशेने उड्डाण करून सायंकाळी ५.१५ वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.

कुंभमेळ्यासाठी ऑनलाइन ई-पास कसा मिळवायचा?

गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये हा कुंभ मेळा सुरु झाला आहे. महाकुंभ मेळ्यासाठी यूपी सरकारकडून विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी ई-पासचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना महाकुंभात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. यूपी सरकारने 6 रंगीत ई-पास जारी केले आहेत. हे पास वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या रंगाचे असतात. रंगीत पासमुळे एखादी व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे ओळखणे सोपे होते. जर तुम्हीही महाकुंभ मेळ्याला जाणार असाल आणि तुम्हाला ई-पास हवा असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

हेही वाचा: MahaKumbh 2025: कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करताय? ऑनलाइन ई-पास कसा मिळवायचा ते जाणून घ्या

ई-पास ऑनलाइन बुक कसे करावे? ? (How To book E-Pass Online for Mahakumbh 2025)

  • जर तुम्हाला ई-पास बुक करण्यासाठी ॲपबद्दल माहिती असेल तर तुम्ही ते सहज बुक करू शकता
  • यासाठी सर्वप्रथम सरकारने वेबसाइटही सुरू केली आहे. तुम्हाला https://epass.kumbh25.in/ या वेबसाइटवर जावे लागेल
  • संकेतस्थळावर ई-पास बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे , महाकुंभ सुरू झाल्यानंतर तुम्ही येथून बुकिंग करू शकता
  • लक्षात ठेवा पास मंजूर होण्यास वेळ लागतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला ज्या कलर पाससाठी अर्ज करायचा आहे त्याच्याशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील
  • उदाहरणार्थ, पांढरा रंग, भगवा रंग, पिवळा रंग, आकाश निळा रंग, निळा रंग आणि लाल रंग जारी करण्यात आला आहे
 

Web Title: Akasa airlines started plane service pune to prayagraj for mahakumbh 2025 latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Prayagraj
  • Pune
  • Pune Airport

संबंधित बातम्या

Pune Airport News: शहराच्या विस्तारासोबतच हवाई सुरक्षेची कसरत; पुणे विमानतळ परिसरात बांधकामांच्या एनओसी अर्जात मोठी वाढ
1

Pune Airport News: शहराच्या विस्तारासोबतच हवाई सुरक्षेची कसरत; पुणे विमानतळ परिसरात बांधकामांच्या एनओसी अर्जात मोठी वाढ

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
2

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

प्रयागराजमध्ये राहुल गांधींचे तरुणांना संबोधन; रोजगार आणि पेपरफुटीवरून सरकारवर निशाणा
3

प्रयागराजमध्ये राहुल गांधींचे तरुणांना संबोधन; रोजगार आणि पेपरफुटीवरून सरकारवर निशाणा

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
4

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.