Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah: “…तर ते व्यर्थ ठरेल”; पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे महत्वाचे विधान

सहकारी चळवळीला मार्केटेबल करायचे आहे. सहकाराचे शिक्षण देण्यासाठी विश्वविद्यालय केली जाणार आहे. सहकाराच्यामाध्यमातून विकासाला दिशा देण्याचे काम सुरु आहे, असे अमित शहा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2025 | 05:25 PM
Amit Shah: “…तर ते व्यर्थ ठरेल”; पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे महत्वाचे विधान
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला सहकाराच्या माध्यमातून म्हणजे देशाच्या विकासाला जाेडले पाहीजे. यासाठी सहकार क्षेत्रासाठी केंद्र सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गत ‘अंब्रेला’ ही शिखर संघटना स्थापन केली असून, दाेन वर्षांत सहकारी बॅंकाचे देशपातळीवर ‘क्लिअरींग हाऊस’ तयार हाेईल, अशी माहीती केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी दिली.

जनता सहकारी बॅंकेच्या अमृत महाेत्सवाचा सांगता समारंभ शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्षा अलका पेठकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित हाेते. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन केले. यावेळी बॅंकेच्या वतीने ‘अंब्रेला’ या संस्थेसाठी  प्रभातकुमार चतुर्वेदी यांच्याकडे पाच काेटी रुपयांचा धनादेशही साेपविण्यात आला.

शहा म्हणाले, ‘‘संचालक मंडळ, सदस्य हे एका हेतूने काम करीत असतील तर काेणतीही संस्था ७५ वर्ष सातत्याने चांगल्या पद्धतीने चालते हे जनता सहकारी बॅंकेच्या वाटचालीतून दिसुन येते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विकसित देश आणि देशाची आर्थिक व्यवस्था पाच ट्रिलियन पर्यंत पाेचविण्याचा निर्धार केला आहे . सहकाराचा विकास झाल्याशिवाय हे शक्य नाही.

शिवसेना अन् राष्ट्रवादीबद्दल अमित शहांचं मोठं विधान, म्हणाले…

आपला देश विकसित झाला, पण प्रत्येक व्यक्तीला काम दिले नाही तर ते व्यर्थ ठरेल. प्रत्येक व्यक्तीला आणि कुटुंबाला विकासाशी जाेडण्यासाठी सहकार हा महत्वाचा भाग आहे.  त्यासाठीच केंद्र सरकारने हे मंत्रालय सुरु केले.’’ देशातील ७० काेटी गरीबांसाठी  घर,वीज, पाणी, शाैचालय, गॅस, आरोग्य , विमा , माेफत धान्य अशा  याेजना राबिवल्या आहेत, आता या प्रत्येक व्यक्तीचा देशाच्या विकासात आता याेगदान हवे आहे. त्यासाठी सहकारच महत्वाचा मार्ग असल्याचे केंद्रीय मंत्री शहा यांनी स्पष्ट केले.

सहकाराच्यामाध्यमातून विकासाला दिशा देण्याचे काम

सहकार चळवळीला ताकद देण्यासाठी केंद्र सरकारने चांगले निर्णय घेतल्याचे नमूद करताना केंद्रीय मंत्री शहा म्हणाले, ‘‘ सहकारी चळवळीला मार्केटेबल करायचे आहे. सहकाराचे शिक्षण देण्यासाठी विश्वविद्यालय केली जाणार आहे. सहकाराच्यामाध्यमातून विकासाला दिशा देण्याचे काम सुरु आहे. देशांत १४६५ नागरी सहकारी बॅंका असुन, त्यापैकी ४६० बॅंका या महाराष्ट्रात  आहे, शेड्युल्ड बॅंका ५९ आहेत. हे लक्षात घेऊन सहकार राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी मागणी केली हाेती.

त्यानुसार पुण्यात ‘सीअारसीएस’चे कार्यालय हाेणार आहे. यामुळे सहकारी बॅंकाच्या अडचणी दुर हाेण्यास मदत मिळेल. शेड्युल्ड बॅंॅकांना यातून ताकद मिळेल. सहकारी बॅंकंाच्या ‘अंब्रेला’ या संघटनेसाठी तीनशे काेटी रुपयांची निधी जमा केला आहे. या निधीचा उपयाेग अाता सहकारी बॅंकाच्या विकासाकरीता केला जाईल. बॅंकेच्या तांत्रिक अडचणी, काेअर बॅंकीग आदीसाठी हा निधी दिला जाईल. नागरी सहकारी बॅंक, जिल्हा सहकारी बॅंक, राज्य सहकारी बॅंकेचा क्लिअरींग हाऊस पुढील दाेन वर्षांत तयार केले जाईल.’’

Web Title: Central home co operation minister amit shah said each people family connect to development of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • Amit Shah
  • cooperation
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: पुणे विभागातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या याद्या प्रसिद्ध; २.७२ लाख पदवीधर, ४४ हजार शिक्षक नोंदणी
1

Pune News: पुणे विभागातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या याद्या प्रसिद्ध; २.७२ लाख पदवीधर, ४४ हजार शिक्षक नोंदणी

“RSS चे स्वयंसेवक निःस्वार्थीपणे…”; ‘या’ कार्यक्रमात शरदराव ढोले नेमके काय म्हणाले?
2

“RSS चे स्वयंसेवक निःस्वार्थीपणे…”; ‘या’ कार्यक्रमात शरदराव ढोले नेमके काय म्हणाले?

Pune Crime: पुरुषावर अत्याचारानंतर आता खंडणीप्रकरणातही अडचणीत; गौरी वांजळेवर दुसरा गुन्हा दाखल
3

Pune Crime: पुरुषावर अत्याचारानंतर आता खंडणीप्रकरणातही अडचणीत; गौरी वांजळेवर दुसरा गुन्हा दाखल

विश्वाच्या इतिहासाला नवे वळण; पुण्याच्या संशोधकांनी लावला 12 अब्ज प्रकाशवर्षांवरील ‘अलकनंदा’चा शोध
4

विश्वाच्या इतिहासाला नवे वळण; पुण्याच्या संशोधकांनी लावला 12 अब्ज प्रकाशवर्षांवरील ‘अलकनंदा’चा शोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.