शिवसह्याद्री प्रतिष्ठान कल्याण पूर्व माध्यमातून राजगडाची सफाई; युवकांसहित लहान मुलांचा मोठा सहभाग
कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे राजगड किल्ले सफाई मोहीम राबवण्यात आली. मोहीमेत तरुणांसहितच लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यांना महारांजाचा इतिहास आणि पुरातन वारश्याचे महत्व पटवून देण्यात आले.
कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रविवारी ऐतिहासिक राजगड किल्ले सफाई मोहीम राबविण्यात आली. त्यात 45जणाचा समावेश होता. राजगड किल्ल्यावरील मोठ्या प्रमाणातील कचरा यावेळी गोळा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी चा वसा जोपसत आजच्या पिढीला गड किल्ले यांचे ऐतिहासिक महत्त्व पुरातन वसा जोपसण्यासाठी कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठान दर वर्षी गड किल्ले सफाई मोहिमेच्या माध्यमातून शिवभक्त सदस्य, युवक ,युवती यांच्या सह गड किल्ले दर्शन घडवित गड किल्ले यावर जात कचरा,पाँलस्टिक बाटल्या, काचेचे तुकडे गोळा करून संकलित कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावित गड किल्ले स्वच्छता मोहीम राबिवितात.यापूर्वी रायगड, शिवनेरी, सिंहगड किल्ले स्वच्छता मोहिम राबविली असून समाजापुढे योग्य आर्दश घातला आहे.
यंदाच्या वर्षी 24नोव्हेंबर रविवार रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राजगड किल्ले स्वच्छता ,सफाई मोहिम तब्बल 45जणांच्या चमुच्या वतीने करण्यात आली.कल्याणहून शनिवारी रात्री निघत सकाळी 7.30वा.सुमारास राजगड पायथ्यापासून गडावर चढाई करण्यास सुरुवात केली. यामध्ये युवक,युवती, शिवभक्त सदस्य यांचा समावेश होता.या गडावर चढाई दरम्यान रस्त्यातील कचरा, पाँलस्टिक बाटल्या, काचसमान तुकडे आदि गोळा करीत संकलन केला.राजगडावर 10.30 च्या सुमारास पोहचल्यानंतर राजगड परिसरात झाडलोट करीत पालापाचोळा, कचरा, पाँलस्टिक बाटल्या काचसमान तुकडे यांचे संकलन करून परिसर स्वच्छ केला.तसेच याप्रसंगी चमुतील युवक युवतींना प्रोबधन करीत राजगडाचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्यात आले.
युवा पिढीला आपल्या पूर्वजाचा इतिहास शरीर संपदा यांचे महत्त्व पटविण्यात आले
एकीकडे मोबाईलचा अति वापर ,व्यसनाधीनतेकडे वळू पाहणारी युवा पिढीला आपल्या पूर्वजाचा इतिहास शरीर संपदा यांचे महत्त्व देखील यानिमित्ताने पटविण्यात आले. गडावरील रस्त्यालगत ठिक ठिकाणी संकलित केलेला कचरा चमूने गडावरून उतरताना पायथ्याशी आणित कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद कडे दिला.आणि राजगड स्वच्छता सफाई मोहीम फत्ते केली.तसेच राजगडच्या पायथ्याशी शिवभक्तची पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शौचालय दुरावस्था प्रश्न या संदर्भात शासन दरबारी पत्रव्यवहार करीत प्रश्न मार्गी लावण्याचा मनसुबा करीत टीमने कल्याण कडे प्रस्थान केले. “
आपला पुरातन गड किल्ले वसा जोपसण्यासाठी स्वच्छता मोहीम
या मोहीम चे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांच्यावतीने करण्यात आले होते, मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष शरद बिरामणे उपाध्यक्ष सजय पाटील खजिनदार सतोष इंगळे यांचे योगदान महत्वपूर्ण होते. “शिवसह्याद्री प्रतिष्ठान कल्याण विभाग अध्यक्ष सतीश पेडणेकर यांनी सांगितले की, आपला पुरातन गड किल्ले वसा जोपसण्यासाठी ,तसेच गड किल्ले यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेणे आजच्या तरूणाईच्या दुष्टीकोनातून महत्वाचे असल्याने शिवसह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ले सफाई स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविते.”
Web Title: Cleaning of rajgad through shiv sahyadri pratishthan in kalyan