Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koregaon-Bhima: रश्मी शुक्लांची कोरेगाव भीमाला भेट; विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा घेतला आढावा

कोरेगाव भीमा ता. शिरूर व सणसवाडी परिसरात एक व दोन जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर प्रत्येक वर्षी पोलीस प्रशासन परिसरात शांतता राखण्यासाठी संचलन करत असतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 28, 2024 | 05:17 PM
Koregaon-Bhima: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची कोरेगाव भीमाला भेट; विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा घेतला आढावा

Koregaon-Bhima: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची कोरेगाव भीमाला भेट; विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा घेतला आढावा

Follow Us
Follow Us:

एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची तयारी पूर्ण होत आली आहे . दरम्यान सदर कार्यकम स्थळी भेट देत प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी करत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आढावा घेतला आहे. तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी भेट देखील दिली.

कोरेगाव भीमा ता. शिरुर सह पेरणे येथील ऐतिहासिक विजयस्तंभ तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली,. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस हवालदार संदीप कारंडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अनिल जगताप कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, भूषण गायकवाड, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, पांडुरंग गायकवाड यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विजयस्तंभ तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीची पाहणी करत येथे समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन तसेच पार्किंग आणि पोलीस बंदोबस्तची माहिती घेतली. दरम्यान पोलीस प्रशासनाला  योग्य सूचना देखील राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहे.

कोरेगाव भीमात पोलिसांचे सशस्त्र संचलन

कोरेगाव भीमा ता. शिरूर परिसरात एक जानेवारी २०१८ ला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या एक जानेवारी विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या कार्यक्रमासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा लावला असून शुक्रवारी  (दि.२७) कोरेगाव भिमातील पुणे नगर महामार्गावरुन पोलिसांनी सशस्त्र संचलन करत परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

कोरेगाव भीमा ता. शिरूर व सणसवाडी परिसरात एक व दोन जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर प्रत्येक वर्षी पोलीस प्रशासन परिसरात शांतता राखण्यासाठी संचलन करत असतात. या वर्षी कोरेगाव भीमा परिसरातील गावांमधुन सामाजीक सलोखा जपण्यासाठी गावातील प्रत्येक चौकात, वस्तीवर एक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे, तर शिक्रापूर पोलिसांच्या वतीने प्रत्येक गावोगाव पोलिस संचलन सुरु करण्यात आले असून पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या सुचनेनुसार नुकतेच घेण्यात आलेल्या या संचलनामध्ये उविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप साळुंके, पोलिस उपनिरीक्षक पोलिस उपनिरीक्षक विजय म्हस्कर, सोमनाथ कचरे, सचिन खलोले, मल्हारी वणवे, संदीप कारंडे, श्रावण गुपचे, महेंद्र पाटील राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांमधील जवान सहभागी झाले होते, तर पोलिसांनी केलेल्या या संचलनामुळे ग्रामस्थ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Dgp ips rashmi shukla visit bhima koregaon review of vijaystambh greeting program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • Koregaon Bhima
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.