Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: राज्य गुणवत्ता यादीत साधना कन्या विद्यालयाचा डंका; गुणवंत विद्यार्थिनींचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गुणगौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 11, 2026 | 04:39 PM
Pune: राज्य गुणवत्ता यादीत साधना कन्या विद्यालयाचा डंका; गुणवंत विद्यार्थिनींचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार

Pune: राज्य गुणवत्ता यादीत साधना कन्या विद्यालयाचा डंका; गुणवंत विद्यार्थिनींचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार

Follow Us
Follow Us:
  • राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थिनींची दमदार कामगिरी
  • शिष्यवृत्तीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश
  • गुणवंत विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
Pune Hadpasar: रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित गुणगौरव समारंभात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थिनींचे यश

राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता आठवीतील अनुष्का अशोक शेंडगे, शरयू बापू मर्गळ, गौरी दिगंबर माने आणि वैदेही संतोष झगडे, इयत्ता पाचवीतील मृणाल मोहन कुलकर्णी तसेच इयत्ता सातवीतील सानवी महेश माळी यांनी प्राविण्य मिळविले. विद्यालयाने यंदाही गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २३+४, इयत्ता सातवीत २७+२ आणि इयत्ता आठवीत ३६+३ विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हेही वाचा: Pune Crime: गणेशोत्सवाच्या तोंडावर FDA ॲक्शन; चार ट्रक पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या ॲक्शनने धुमाकूळ

NMMS, RTS आणि ऑलिम्पियाडमध्येही यश

शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच इतर स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चांगली कामगिरी केली. इयत्ता आठवीच्या NMMS परीक्षेत ५२ विद्यार्थिनी, इयत्ता सातवीच्या RTS परीक्षेत ११ विद्यार्थिनी, तर इयत्ता नववीच्या रयत ऑलिम्पियाडमध्ये दोन विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या आहेत. या यशामुळे विद्यालयाने शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांमधील गुणवत्तेची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

हेही वाचा: Pune: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत तीन भागांत मद्यविक्रीवर निर्बंध

मान्यवरांकडून विद्यार्थिनींचे कौतुक

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे, अरविंद तुपे, विभागीय अधिकारी संजय मोहिते, दत्तात्रय गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य आनंदराव करे, माजी प्राचार्या उर्मिला पाटील, पर्यवेक्षक तृप्ती पाटील, पौर्णिमा सावंत, धीरज कोळकर, संस्थेचे लाइफ मेंबर लालासाहेब खलाटे, तुकाराम डोंगरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व सेवक, पालक आणि परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

Web Title: Felicitations by sunetra pawar for achievements ranging from scholarships to nmms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.