Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेल्यावर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा रस्त्यांवर खड्डे कमी; महापौर मंजुषा नागपुरे यांचा दावा

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भात महापौर नागपुरे यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी खड्डे असल्याचा दावा केला आहे. तसेच पाऊस पडला की खड्डे पडतात असेही त्यांनी नमूद केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2026 | 01:02 PM
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर खड्डे कमी

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर खड्डे कमी

Follow Us
Follow Us:

पुणे : शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर खड्डे कमी असल्याचा दावा महापौर मंजुषा नागपुरे यांनी केला आहे. त्याचवेळी स्थायी समितीने खड्डयांसदर्भात प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकेत मात्र बैठका, पाहण्या आणि सूचना यांचेच सत्र सुरू असल्याचे चित्र आहे.

वाहनचालकांना जीव धोक्यात घालून खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत असताना प्रत्यक्ष दुरुस्तीची गती अत्यंत मंद असल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. राजकीय पदाधिकारी आणि प्रशासनाकडून सातत्याने आढावा बैठका घेतल्या जात असल्या, तरी रस्त्यांवरील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

अनेक ठिकाणी डांबरी थर उखडल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून, दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, खड्डे बुजविण्याची मोहीम अपेक्षित वेगाने राबविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.

दरम्यान, प्रत्यक्षात खड्ड्यांच्या समस्येवर केवळ चर्चा आणि निर्देश या पलीकडे ठोस कृती दिसत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात खडी किंवा कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी पुढील पावसात ते पुन्हा उखडत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भात महापौर नागपुरे यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी खड्डे असल्याचा दावा केला आहे. तसेच पाऊस पडला की खड्डे पडतात असेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी स्थायी समितीच्या बैठकीत खड्डयांवर चर्चा झाली. या चर्चेची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

‘संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्यांची स्थिती तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाच ते सहा झोनमधील अधिकारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे अहवाल सादर करणार असून, ज्या ठिकाणी खड्डे आढळतील ते तातडीने बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा दर्जा तपासला जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये, शहर सुस्थितीत दिसले पाहिजे आणि प्रशासनाने जबाबदारीने काम केले पाहिजे’, असे भिमाले म्हणाले.

निवासी डॉक्टरांच्या संपाचा ससूनच्या नियमित सेवांवर परिणाम; मोठ्या-लहान शस्त्रक्रिया घटल्या

Web Title: Fewer potholes on pune roads this year compared to last year says mayor manjusha nagpure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार? नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
1

अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार? नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.