Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार? नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्थायी समितीकडे एक महत्वाची मागणी केली आहे, याबाबतचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समिती समोर सादर केला आहे. बुधवारच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2026 | 03:03 PM
अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार? नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार? नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Follow Us
Follow Us:
  • अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार?
  • नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
  • दहा लाखांपर्यंत सहाय्याचे धोरण प्रस्तावित
पुणे : पुणे महापालिका हद्दीत रस्ते अपघातांसह महापालिकेच्या रस्ते, नाले, पदपथ, बांधकामे, सार्वजनिक ठिकाणे आणि विविध सेवांशी संबंधित दुर्घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना तातडीचा आर्थिक आणि वैद्यकीय आधार मिळावा, यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत साहाय्य देण्याचे धोरण तयार करण्याची मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर सादर केला असून, कायदेशीर नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंतरिम मदत देण्याची तरतूद करण्याची मागणी केली आहे.

 

बुधवारच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. पुणे महानगरपालिका अपघातग्रस्त नागरिक सहाय्यता धोरण या नावाने ही योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. अपघातानंतर उपचारांचा मोठा खर्च संबंधित कुटुंबावर कोसळतो. त्यात कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाचा आर्थिक आधारही संपुष्टात येतो. विमा किंवा न्यायालयीन नुकसानभरपाई मिळण्यास मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिकेने मानवतावादी दृष्टिकोनातून अंतरिम मदत द्यावी, अशी भूमिका नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मांडली आहे. प्रस्तावानुसार, पात्र अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रुपयांपर्यंत सहाय्य देण्याची तरतूद सुचविण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

गंभीर दुखापत किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख, तर किरकोळ दुखापतीसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत प्रस्तावित आहे. अतिगंभीर जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास परिस्थितीनुसार एक लाख रुपयांपर्यंत तातडीची अंतरिम वैद्यकीय मदत देता येणार आहे. या रकमा कमाल मर्यादा असून, अंतिम आर्थिक मर्यादा निश्चित करण्यापूर्वी विधी विभाग, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि संबंधित विभागांचा अभिप्राय घेतला जाणार आहे. मदतीसाठी पोलिसांची नोंद किंवा एफआयआर, वैद्यकीय प्रमाणपत्र, रुग्णालयीन कागदपत्रे, मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारसाची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. गंभीर प्रकरणात रुग्णालयाला थेट रक्कम देण्याचीही व्यवस्था सुचविण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Web Title: Corporator amol balwadkar has made an important request to the standing committee of the pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
1

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
2

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.