Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GBS Update: गुलईन बेरी सिंड्रोमच्या आजारात रुग्ण दगावत नाही; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्री आबिटकर यांनी जीबीएसचे रुग्ण ज्या भागात जास्त आढळून आले अशा सिंहगड रस्ता भागात पाहणी केली. या भागातील नागरीकांनी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2025 | 02:35 AM
GBS Update: गुलईन बेरी सिंड्रोमच्या आजारात रुग्ण दगावत नाही; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
Follow Us
Follow Us:

पुणे:  पुणे शहर व परिसरात गुलईन बेरी सिंड्रोम (जीबीएस ) या आजाराचे एकूण १०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. सोलापूर मध्ये या आजाराचा संशयित एक रुग्ण दगावल्याबाबत माहीती घेण्यात येत आहे. या आजारात मृत्यू हाेत नाही, परंतु झाला असेल तर काळजी घ्यावी लागेल असे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.

मंत्री आबिटकर यांनी जीबीएसचे रुग्ण ज्या भागात जास्त आढळून आले अशा सिंहगड रस्ता भागात पाहणी केली. या भागातील नागरीकांनी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. साेलापुर येथे एक रुग्णाचा मृत्यू झाल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले ‘‘याबाबत माहिती घेतली जात आहे.पण जीबीएसच्या आजारात रुग्ण दगावत नाही.यापूर्वी देखील अनेक रुग्ण हे जीबीएस चे आढळले आहे आणि यात रुग्णांना त्रास झाला आणि ते ऍडमिट देखील झाले. परंतु नंतर परिस्थिती सुधारल्यावर रुग्ण हे घरी परत गेले. पुण्यात या आजराचे रुग्ण हे वाढले आहेत आणि हा काळजीचा विषय आहे. तसेच दगावलेल्या रुग्ण हा जर जीबीएस मुळे दगावला असेल तर काळजी घ्यावी लागेल.’’

ते पुढे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी काही मोफत उपचाराची घोषणा केली त्याच उद्देश फक्त एवढंच आहे की जे गरीब रुग्ण आहे त्यांना महापालिकेच्या माध्यमातून उपचार मिळाले पाहिजे.तसेच रुग्णांसाठी आर्थिक निधीची तरतूद केली जात असून या रुग्णांना उपचार मिळणार असल्याचं यावेळी आबिटकर म्हणाले.

यावेळी नांदेड गावातील गावकरी म्हणाले की जेव्हा पासून आमचं गाव महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे तेव्हा पासून आम्हाला पाण्याची समस्या असून असच पाणी हे आम्हाला प्यायाव लागत आहे.कोणतेही काम महापालिकेच्या माध्यमातून होत नाहीये.महापालिका लक्ष देत नसल्याचं यावेळी या नागरिकांनी सांगितले.

गुइलेन बॅरी सिंड्रोमची धोक्याची घंटा; केंद्राचे आरोग्य पथक पुण्यात दाखल

गेल्या काही दिवासांपासून पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमने थैमान घातले आहे. आतापर्यंत पुण्यात 111 रुग्णांची नोंद करण्यात आली असून सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये दोन दोन रूग्ण आढळून आले आहेत. यासोबत नागपूरमध्येही 6 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. राज्यातील वाढत्या जीबीएस रुग्णांची संख्या पाहता राज्यासह केंद्र सरकारची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. केंद्र सरकारनेही जीबीएसवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारकडून जीबीएस आजारासंदर्भात केंद्रीय आरोग्य यंत्रणांचे पथक नियुक्त केले असून हे पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे.

हेही वाचा: Pune GBS Update: गुइलेन बॅरी सिंड्रोमची धोक्याची घंटा; केंद्राचे आरोग्य पथक पुण्यात दाखल

गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या (GBS) वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तज्ज्ञांचे पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. या पथकात विविध क्षेत्रांतील सात तज्ज्ञांचा समावेश असून, त्यामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), दिल्ली, निमहान्स, बेंगळुरू, प्रादेशिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय, तसेच पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) च्या तज्ज्ञांचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra health minister prakash abitkar visit pune and statement about guillain barr syndrome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Guillain Barre syndrome
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.