Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येळकोट येळकोट जय मल्हार! जेजूरी गडावर भाविकांची अलोट गर्दी; लाखो भक्तांकडून मुक्तहस्ताने भंडाऱ्याची उधळण

भाविक भक्तांची गडावर मोठी गर्दी उसळली होती. मंदिराला प्रदक्षिणा घालत उत्तर दरवाजाने पालखीने स्नानासाठी कऱ्हा नदीकडे प्रस्थान केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2024 | 07:49 PM
येळकोट येळकोट जय मल्हार! जेजूरी गडावर भाविकांची अलोट गर्दी; लाखो भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण

येळकोट येळकोट जय मल्हार! जेजूरी गडावर भाविकांची अलोट गर्दी; लाखो भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण

Follow Us
Close
Follow Us:

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोक दैव असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये सोमवती निमित्त आज सकाळपासूनच भाविक भक्तांनी सोमवती यात्रेनिमित्त  पालखी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी  जेजुरीगडावर हजेरी  लावण्यास  सुरुवात केली. सकाळी ठीक अकरा दरम्यान जेजुरी गडावर मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त पदाधिकारी,ग्रामस्थ,खांदेकरी मानकरी, भाविक भक्त, त्याचबरोबर महाराष्ट्रातून तसेच इतर  राज्यातून आलेले भाविक भक्त  गडावर सोमवती पालखी निमित्त हजर होते.

पहाटे  भूपाळी, काकड आरती,  नित्य पूजा, पार पडल्यानंतर अकरा वाजता उत्सव मूर्तींना विधिवत  पालखीमध्ये ठेवण्यात आले.यावेळी जेजुरीचे इनामदार राजाभाऊ पेशवे, सचिन पेशवे, माळवदकर पाटील,खोमणे पाटील, मार्तंड देव संस्थांचे  विश्वस्त आणि खांदेकरी मानकरी सोहळ्याचे पदाधिकारी  उपस्थितीत होते. कायदा सुव्यवस्था योग्य राहावा यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते.   काही पोलीस कर्मचारी खांदेकरींच्या वेशभूषेत  दिसून आले. सरकार पेशवे यांनी आदेश देतात खांदेकरांनी “सदानंदाचा येळकोट “येळकोट येळकोट जय मल्हार” असे गर्जना करत पालखी उचलली जमलेल्या लाखो भाविकांनी  भंडाराची उधळण केली.

भाविक भक्तांची  गडावर मोठी गर्दी उसळली होती. मंदिराला प्रदक्षिणा घालत उत्तर दरवाजाने पालखीने स्नानासाठी कऱ्हा  नदीकडे प्रस्थान केले.यावेळी गडाच्या दुतर्फा उभे असलेल्या सर्व भावी भक्तांनी पालखी वर मुक्तहस्ताने  भंडाराची उधळीत करत येळकोट येळकोट जय मल्हार नावाचा जयघोष केला. पालखी मुख्य द्वारातून बाहेर पडून नंदी चौकातून गौतमेश्वर मंदिराकडे रवाना झाली. या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने  भाविक भक्त उपस्थित होते.

 पालखी गावातुन कऱ्हा नदीच्या दिशेने मार्गस्थ झाली. महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेले भाविक पालखी मार्गावर वेगवेगळ्या ठीकठिकाणी  खंडोबा देवाच्या पालखीची वाट पाहत बसलेले दिसून आले पालखी येताच भंडाराची उधळून करत खंडोबाच्या नावाचा जयघोष करत होते. सायंकाळी पालखी करा नदी जवळ पोहोचली रंभाई शिंपिंग घाट या ठिकाणी पालखी पोहचली.   मुंबई,नाशिक त्याचबरोबर अनेक जिल्ह्यातून भाविक भक्तांनी   प्रचंड गर्दी केली होती. सायंकाळी सर्वांचे साक्षीने सहाच्या दरम्यान खंडोबा देवाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा स्नान घालून महाआरती करून  पुन्हा हा पालखी सोहळा जेजुरीकडे रवाना झाला.

 ठिकठिकाणी भाविक भक्तांसाठी जेवणाची सोय तेथील ग्रामस्थांनी केली होती.काही ठिकाणी भाविक भक्तांनी पाण्याची सोय देखील केली होती. सायंकाळी  ग्रामदेवता जानुबाई मंदिर येथे पालखी येऊन विसावली.यावेळी ग्रामस्थांनी व अबालवृद्धांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. रात्री ठीक आठ वाजता पालखीने गडावरती प्रस्थान ठेवले.गावातून पालखी जात असताना अनेक ग्रामस्थांनी  पालखीसाठी पायघड्या, फुलांचा सडा,रांगोळ्या काढल्या होत्या भंडाराचे उधळण फटाक्यांच्या आतिषबाजी  करत पालखी खंडोबा गडावरमार्गस्थ झाली पालखीने पुन्हा एकदा मंदिराभोवती  प्रदक्षिणा घातली यावेळी तरुण खांदेकरी आपल्या खंडोबा देवाला खांद्यावर नाचवत उत्साहित दिसून आले . खांदेकरी मानकरी ग्रामस्थ व भाविक भक्त यांना रोजमुरा वाटून सोमवती पालखी सोहळ्याचे सांगता झाली.

सोमवती यात्रेनिमित्त होणारी भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन जेजुरीतील अतिक्रमण काढून पालखी महामार्ग मोकळा केला होता त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी अधिकचा  पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी देखील योग्य नियोजन केले होते.
 दीपक वाकचौरे – पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन.

Web Title: Many devotees attend somvati amavasya at khandoba temple at jeuri gad jejuri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 07:49 PM

Topics:  

  • jejuri
  • Jejuri Khandoba Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.