पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावर महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात. येथे उधळण्यात येणारा भंडारा हा भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जात असला तरी यामध्ये भेसळ असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाला ओळखलं जातं. बऱ्याच मराठी कुटुंबाचं खंडेराया कुलदैवत आहे. त्यामुळे नवविवाहित जोडपं या ठिकाणी देवाच्या दर्शनाला येतात.
साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ( २८ ऑगस्ट ) दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना…