Jejuri Warkari Accident Video : सोमवारी (१३ जुलै) वारीदरम्यान घडलेल्या थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकणात ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून अपघाताची सखोल चौकशी सुरु आहे.
Jejuri Accident: जेजुरी जवळ पंढरपूर वारीला निघालेल्या महिला वारकऱ्यांच्या जत्थ्याला ट्रकने उडवले. या अपघातात ३ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर.
पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या मिरज तालुक्यातील कवलापूर, मालगाव आणि कसबे डिग्रज येथील तीन महिला वारकऱ्यांचा जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे तिन्ही गावांवर शोककळा पसरली असून अनेक वारकरी जखमी…
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या जेजुरी गडावर मंदिर सेवेकरी, पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचत आरोपींचा माग काढला आणि अल्पावधीतच मुलाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले. या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांकडून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.
केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र मार्गांपैकी आळंदी-पंढरपूर महामार्गावर लवकरच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पथदिवे उभारण्यात येणार आहेत.
जेजुरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.
जेजुरी रेल्वे स्थानकापासून जवळच मोरगाव, नारायणपूर, भुलेश्वर, पांडेश्वर, वीर म्हस्कोबा, सासवड येथील शिवमंदिरे, बालाजी मंदिर व किल्ले पुरंदर ही प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळे असून ती सध्या अधिक विकसित होत आहेत.
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या अनुषंगाने मतदान प्रक्रिया व मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘जय मल्हार’ या मराठी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आणि चाहत्यांचे आशीर्वाद घेतलेला प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने खंडोबाच्या चरणी स्वतःच हक्कच घर घेतलं आहे
हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी असलेली श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोमवारी यवत पालखी तळ (भैरवनाथ मंदिर) येथे रात्रीच्या मुक्कामाला विसावली.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेला भीषण अपघात हा ओव्हरस्पीडमुळे झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर, जखमीपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू तर चार व्यक्ती जखमी झाले…
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून, साहित्य उतरवत असलेल्या पिकअपला एका भरधाव कारने धडक देऊन ८ जणांचा जागिच मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावर महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात. येथे उधळण्यात येणारा भंडारा हा भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जात असला तरी यामध्ये भेसळ असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
एकेकाळी बिहार हे देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेले राज्य म्हणून ओळखले जायचे.परंतु आता महाराष्ट्रामध्ये बिहारलाही मागे टाकतील,असे प्रकार बिनबोभाट सुरु आहेत.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाला ओळखलं जातं. बऱ्याच मराठी कुटुंबाचं खंडेराया कुलदैवत आहे. त्यामुळे नवविवाहित जोडपं या ठिकाणी देवाच्या दर्शनाला येतात.
आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी सासवड रस्त्यावरील बेलसर फाटा जवळ एसटी बस व दुचाकीचा जोरदार अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले.