Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“वडगाव शेरीमधील जनता…”; उमेदवारी जाहीर होताच बापूसाहेब पठारेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्या यादीमधून ४४ जणांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2024 | 08:28 PM
"वडगाव शेरीमधील जनता..."; उमेदवारी जाहीर होताच बापूसाहेब पठारेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

"वडगाव शेरीमधील जनता..."; उमेदवारी जाहीर होताच बापूसाहेब पठारेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Follow Us
Follow Us:

पुणे: पुण्यातील बहुचर्चित पैकी एक असलेला वडगावशेरी मतदार संघातून पहिली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) उमेदवार दिला असून, माजी आमदार राहिलेले बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बापूसाहेब पठारे यांची मतदारसंघात असलेली पकड यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जाते. बापूसाहेब पठारे सरपंच ते आमदार असा प्रवास आहे. ते खराडीमधून सरपंच होऊन राजकीय जीवनास सुरुवात झाली आहे. नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि नंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) परत आले. आता दुसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्या यादीमधून ४४ जणांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी बारामतीमधून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली होती. बारामतीमध्ये काका-पुतणे अशी लढत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेने या आता शरद पवार गटाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. तर पुण्यातून हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बाप्पु पठारे म्हणाले, “पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी देखील माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता आणि आत्ता देखील माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे.वडगांव शेरी मतदार संघातील जनतेच विश्वास माझ्या वर असून या निवडणुकीत मी भरघोस मतांनी विजयी होणार आहे.अस मला विश्वास असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल. यावेळी बाप्पू पठारे यांना वडगाव शेरी मतदार संघाची निवडणूक ही कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार असल्याचं विचारलं असता ते म्हणाले की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर मी लढणार आहे आणि मी आमदार असताना केलेली काम आणि मागील 10 वर्षात मतदार संघाचं जे हाल झालं आहे ते जनतेला माहीत असून आज मतदार संघात वाहतूक कोंडीचा प्रश्न हा ज्वलंत असून तो सोडविण्यावर माझं भर असणार आहे. ”

दरम्यान वडगाव शेरी मतदार संघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी दावा केला आहे की आज पर्यंत सर्वाधिक निधी मतदार संघात मीच आणला असल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी पठारे यांना याबाबत विचारले  असता ते म्हणाले की जर एवढा निधी आणला आहे तर तो मतदार संघात दिसायला हवा. मात्र जो निधी आमदार सांगत आहे तो निधी फक्त कागदावरच दिसत आहे मतदारसंघात कोणतेही काम झाले नसल्याचे यावेळी पठारे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार

१. जयंत पाटील -इस्लामपूर
२. अनिल देशमुख – कटोल
३. राजेश टोपे – घनसावंगी
४. बाळसाहेब पाटील – कराड उत्तर
५. जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
६. शशिकांत शिंदे – कोरेगाव
७. जयप्रकाश दांडेगांवकर – बसमत
८. गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
९. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
१०. प्राजक्त तनपुरे – राहुरी
११. अशोक पवार – शिरूर
१२. मसिंगराव नाईक – शिराळा
१३. सुनील भुसारा – विक्रमगड
१४. रोहित पवार – जामखेड कर्जत
१५. विनायकराव पाटील – अहमदपूर
१६. राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा
१७. सुधाकर भालेराव – उदगीर
१८. चंद्रकांत दानवे – भोकरदन
१९. चरण वाघमारे – तुमसर
२०. प्रदीप नाईक – किनवट
२१. विजय भामरे – जितूर
२२. पृथ्वीराज साठे – केज
२३. संदीप नाईक – बेलापूर
२४. बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी
२५. दिलीप खोडपे – जामनेर
२६. रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
२७. सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
२८. दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
२९. रविकांत गोपचे – किरोडा
३०. भागयश्रि यात्राम – अहिरी
३१. बबलू चौधरी – बदनापूर
३२. सुभाष पवार – मुरबाड
३३. राखी जाधव – घाटकोपर पूर्व
३४. देवदत्त निकम – आंबेगाव
३५. युगेंद्र पवार – बारामती
३६. संदीप वरपे – कोपरगाव
३७. प्रताप धाकणे – शेवगाव
३८. राणी लंके – पारनेर
३९. मेहबूब शेख – आष्टी
४०. नारायण पाटील – करमाळा
४१. महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
४२. प्रशांत यादव – चिपळूण
४३. समरजीत घाटगे – कागल
४४. रोहित पाटील – तासगाव – कवठेमहाकाळ
४५. प्रशांत जगताप – हडपसर

Web Title: Ncp sharad pawar faction vadgaon sheri candidate bapisaheb pathare said people will elected me in election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 08:13 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.