Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchwad: ओपन स्पेस मध्ये गाळे उभारून भाड्याने दिले? महिंद्रा अँथियाला महापालिकेचा दणका

मंजूर नकाशात नसलेली दुकाने अचानक सोसायटीच्या आवारात उभी राहिली आणि ती चक्क भाड्यानेही दिली गेली. नेमका हा प्रकार कसा घडला? तक्रारीनंतर महापालिकेने थेट नोटीस बजावताच आता सोसायटी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 09, 2026 | 11:21 AM
Pimpri Chinchwad: ओपन स्पेस मध्ये गाळे उभारून भाड्याने दिले? महिंद्रा अँथियाला महापालिकेचा दणका

Pimpri Chinchwad: ओपन स्पेस मध्ये गाळे उभारून भाड्याने दिले? महिंद्रा अँथियाला महापालिकेचा दणका

Follow Us
Follow Us:
  • परवानगी शिवाय व्यावसायिक गाळे उभारल्याचा आरोप
  • अनधिकृत गाळे भाड्याने देऊन आर्थिक उत्पन्न घेतल्याचा आरोप
  • महापालिकेनी महिंद्रा अँथियाला दिली नोटीस
पिंपरी चिंचवड: मंजूर बांधकाम नकाशाचे उल्लंघन करून पिंपरीतील महिंद्रा अँथिया सहकारी गृहरचना संस्थेच्या आवारात अनधिकृतपणे व्यावसायिक गाळे उभारून ते भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरेश भाटिया यांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सोसायटीला नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी बांधकाम विभागाकडून स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरीतील नेहरूनगर परिसरातील महिंद्रा अँथिया ही गृहनिर्माण संस्था आहे. सोसायटीच्या आवारातील इमारतीच्या सामायिक वापरासाठी असलेल्या जागेत मंजूर नकाशात तरतूद नसताना अंतर्गत बदल करून व्यावसायिक गाळे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. हे गाळे इतर व्यावसायिकांना भाड्याने देण्यात आल्याने सामायिक जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाटिया यांनी मंजूर बांधकाम नकाशाच्या प्रती आणि इतर कागदपत्रांसह महापालिकेकडे तक्रार केली. सोसायटीतील सामायिक जागेचा परवानगीशिवाय व्यावसायिक वापर होत असल्यास त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार

महापालिकेने बजावलेल्या नोटीसमुळे सोसायटीच्या व्यवस्थापन समितीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मंजूर नकाशाव्यतिरिक्त करण्यात आलेले बदल आणि व्यावसायिक वापराबाबत सोसायटी पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अनधिकृत बांधकाम अथवा वापर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Pune Traffic: पुणेकरांनो, लक्ष द्या! पुण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवे नियोजन; तीन भागांत होणार बदल

उपनिबंधकांकडेही कारवाईची मागणी

सोसायटीतील वाढीव दुकानाच्या वापराबाबत महापालिकेने जिल्हा उपनिबंधकांकडेही पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेची नोटीस मिळूनही अनधिकृत गाळे हटविण्यात आले नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मंजूर नकाशाव्यतिरिक्त विनापरवाना गाळे निर्माण करून त्यांचा वापर केल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व संबंधित नियमांचा भंग झाला आहे का, याची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम विभागाला इमारतीची स्थळ पाहणी करून मंजूर नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकामाची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मंजूर नकाशाव्यतिरिक्त करण्यात आलेल्या गाळ्यांच्या वापराबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

– अजिंक्य येळे, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

“महिंद्रा अँथिया सोसायटीत मंजूर नकाशाव्यतिरिक्त वापरात बदल करून दुकाने काढल्याबाबत पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. बांधकाम विभागाला स्थळ पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्यास सांगितले आहे. मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेल्या गाळ्यांच्या वापराबाबत वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे.”

 

Web Title: Pimpri chinchwad mahindra anthea gets a slap from the municipal corporation for building a house in an open space and renting it out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:22 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.