
आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी : पोलिसयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आगामी काळात आयुक्तालयाचे कामकाज सुरळीत चालणार आहे. चौबे यांनी प्रामुख्याने यापूर्वीमंजूर पोलीस अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ करून घेतली. जादा अधिकाऱ्यांना मंजुरी घेऊन त्यांची नियुक्ती केली. पोलीस आयुक्तालय, परेड तसेच पोलीस भरतीसाठी जागा, अधिकाऱ्यांच्या निवासासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न मार्गी लावला. पेट्रोलिंगसाठी लागणारीवाहने उपलब्ध करून घेतली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 22 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर त्यांना आयुक्तालयाचीजागा, पोलीस ग्राउंड, अधिकारी यांना घरे, पोलीस ठाण्यांच्या जागा, सायबर पोलीस ठाणे, अधिकारी, कर्मचारी यांची संख्या कमीअश्या अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासोबत नवीन असणाऱ्याआयुक्तालयाच्या समस्या सोडविण्यासाठी सततचा पाठपुरावा सुरु केला. याचेच फळ म्हणजे नुकतेच शासनाने पोलीसआयुक्तालयासाठी चिखली येथे 3.39 हेकटर जागा मजूर केली.तसेच उपायुक्त कार्यालय, अधिकाऱ्यांची निवास स्थाने आणि डाँगस्कॉड साठी वाकड येथे 15 एकर जागा मजूर झाली.
चौबे यांच्या पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे भाड्याच्या शेटर मध्ये सुरु असलेल्या सांगवी पोलीस ठाण्याला हक्काची जलसंपदा विभागाची20 गुंठे जागा मिळाली. सहायक पोलीस आयुक्त एमआयडीसी आणि चिखली पोलीस ठाण्यासाठी पूर्णानगर येथे 9 गुंठे जागामिळाली. पोलीस उपायुक्त तीन यांच्या कार्यालयासाठी पिंपरी एमआयडीसी येथे 20 गुंठे जागा मिळाली. हिंजवडी पोलीस ठाणेअंतर्गतमाणगाव चौकीसाठी 4 गुंठे जागा मिळाली. स्वतत्र सायबर पोलीस ठाण्यास मंजुरी मिळाली.