Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुण्याला हक्काचे पाणी कधी मिळणार? महापालिकेची मागणी जलसंपदा विभाग ऐकणार? वाचा सविस्तर

Khadakwasla Dam: पुणे शहराचा पाणी पुरवठा हा खडकवासला धरण साखळीवर अवलंबुन आहे. या धरण साखळीतील चारही धरणांची एकुण साठवण क्षमता ही २९ टिएमसी इतकी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2025 | 02:11 PM
Pune News: पुण्याला हक्काचे पाणी कधी मिळणार? महापालिकेची मागणी जलसंपदा विभाग ऐकणार? वाचा सविस्तर

Pune News: पुण्याला हक्काचे पाणी कधी मिळणार? महापालिकेची मागणी जलसंपदा विभाग ऐकणार? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

पुणे: वीस वर्षाहून अधिक कालावधी उलटला तरी  पुणे शहराला वाढीव पाणी काेटा अद्याप मंजुर केला गेला नाही. शहराची लाेकसंख्या ७० लाखाच्या घरात पाेहचली असुन, पुण्याची वर्षभराची तहान भागविण्यासाठी २१ टिएमसी इतकी पाण्याची गरज आहे. वाढीव काेटा  मंजुर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पुणे शहराचे क्षेत्रफळ हे लगतची गावे समाविष्ट केली गेल्याने वाढत आहे. १९९७ साली महापािलका हद्दीत ३८ गावे समाविष्ट केली गेली. त्यानंतर वीस वर्षानंतर ११ आणि त्यानंतर २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट केली गेली.

पुणे शहराचा पाणी पुरवठा हा खडकवासला धरण साखळीवर अवलंबुन आहे. या धरण साखळीतील चारही धरणांची एकुण साठवण क्षमता ही २९ टिएमसी इतकी आहे. त्याचवेळी हवेली, दाैंड, इंदापुर आदी तालुक्यातील शेतीसाठी या धरणांतून कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जाताे. वीसहून अधिक वर्षापुर्वी पुणे शहराला जलसंपदाविभागाने सुमारे साडे अकरा टिएमसी इतका पाणी पुरवठा मंजुर केला हाेता. शहराचा हाेणारा विस्तार, वाढणारी लाेकसंख्या लक्षात घेत पुणे महापािलकेने वेळाेवेळी पाण्याचा काेटा वाढवून मिळावा अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्यामागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान जलसंपदा विवभागाकडून पुणे शहराला साडे चाैदा टिएमसी इतका काेटा मंजुर असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात पुण्याची तहान भागविण्यासाठी वर्षाला २१ टिएमसी इतकी पाण्याची गरज असल्याचा दावा पुणे महापािलका करीत आहे.

हेही वाचा: Pune Water News: पुण्यात ‘पाणी’ पेटणार! ७१४ काेटी रुपये न भरल्यास…; महानगरपालिकेला नोटीस

दरवर्षी कालवा समितीच्या बैठकीत महापािलकेकडून वाढीव काेटा मिळविण्यासाठी वाॅटर बजेट मध्ये मागणी केली जात असते. पुणे महापािलकेने पाणी पुरवठ्यासाठी उचललेल्या पाण्याच्या बदल्यात प्रक्रीया केलेले साडे सहा टिएमसी पाणी मुंढवा जॅकवेल येथून जलसंपदा विभागाला द्यावे अशी अट घातली गेली आहे. या अटीची पुर्तता करण्याचा प्रयत्न महापािलका करीत असली तरी जलसंपदा विभागाकडून त्या प्रमाणात पाणी उचलले जात नसल्याची माहिती पुढे आली हाेती.

अन्य पर्यायांचा विचार

शहराचा विस्तार लक्षात घेऊन शहराच्या उत्तर पुर्व भागात असलेल्या नगर रस्ता परीसरात भामा आसखेड प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जात आहे. चार वर्षांपुर्वी ही याेजना कार्यान्वित झाली. मुळशी धरणातूनही पाच टिएमसी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पडून आहे. हे पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे सातत्याने सांगत आहे. परंतु, अद्याप त्यावर ठाेस मार्ग निघाला नाही.

इतर स्त्राेतांचा उपयाेग करणार ?

महापािलकेच्या हद्दीत काही गावे समाविष्ट झाली असुन, या गावांच्या लगत काही तलाव आहेत. या तलावांतील पाण्याचा उपयाेग पाणी पुरवठ्यासाठी करता येईल का ? याचा विचार करणे गरजेेचे अाहे. कात्रज तलाव, जांभुळवाडी तलाव आदींचे पाणी प्रदुषित हाेत असुन, ते राेखण्यासाठी कठाेर उपाययाेजना करणे आवश्यक आहे. तसेच कात्रज घाट परीसरातही लघु बंधारा बाधण्याचा विचार काही वर्षांपुर्वी पुढे आला हाेता. अशा विविध पर्यायी स्त्राेतांवरही विचार हाेणे गरजेचे आहे.

Web Title: Pune corporation demand to irrigation department increased water quota for pune city and people khadakwasla dam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.