Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर चालू बांधकामे पुणे महापालिका रोखणार; प्रशासन ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर…

उघडे खड्डे, खोदकाम केलेले भाग, अपूर्ण रस्ते आणि अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य यामुळे नागरिकांच्या अपघाताचा धोका कायम असतो. दिवाळीच्या सुट्यांमध्ये कामगारांची संख्या कमी होणे आणि आवश्यक साधनसामग्रीचा अभाव यामुळे हा धोका आणखी वाढतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2026 | 09:17 AM
...तर चालू बांधकामे पुणे महापालिका रोखणार; प्रशासन 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर...

...तर चालू बांधकामे पुणे महापालिका रोखणार; प्रशासन 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर...

Follow Us
Follow Us:
  • पुणे महानगरपालिकेने शहरातील सुरू असलेल्या बांधकामांबाबत ठेकेदारांना कडक इशारा दिला आहे.
  • दिवाळीच्या सुट्यांमध्येही बांधकामाचा वेग कायम ठेवण्याच्या नावाखाली सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई केली जाणार आहे.
  • बांधकामस्थळी नागरिक आणि कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे : दिवाळीच्या सुट्यांमध्ये बांधकामाचा वेग कायम ठेवण्याच्या नावाखाली नागरिक आणि कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या ठेकेदारांची आता गय केली जाणार नाही. पुणे महानगरपालिकेने शहरातील सुरू असलेल्या बांधकामांबाबत ठेकेदारांना कडक इशारा दिला आहे. पुरेसे कामगार, कुशल कर्मचारी आणि तर बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर करारातील अटींनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात शहर अभियंता कार्यालयाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.

शहरात पुणे महापालिका तसेच खासगी बांधकाम कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून रस्ते, पूल, इमारतींसह विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी उघडे खड्डे, खोदकाम केलेले भाग, अपूर्ण रस्ते आणि अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य यामुळे नागरिकांच्या अपघाताचा धोका कायम असतो. दिवाळीच्या सुट्यांमध्ये कामगारांची संख्या कमी होणे आणि आवश्यक साधनसामग्रीचा अभाव यामुळे हा धोका आणखी वाढतो.

मागील वर्षीच्या सुट्यांदरम्यान पुरेशी साधनसामग्री उपलब्ध अपघात नसल्याने झाले होते. काही अशा बांधकामांच्या घटनांची पुनरावृत्ती ठिकाणी टाळण्यासाठी महापालिकेने यंदा सुरक्षा व्यवस्थेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ज्या ठिकाणी बांधकाम सुरू राहणार आहे, तेथे पुरेसे कुशल आणि अकुशल कामगार उपलब्ध असणे बंधनकारक आहे. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसतील, तर काम सुरू ठेवता येणार नाही. रस्त्यावर खोदलेले खड्डे, नाले आणि धोकादायक भागाभोवती मजबूत बॅरिकेडिंग करावे लागणार आहे.

प्रत्यक्ष पाहणीचे आदेश

सुरक्षा नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रातील कनिष्ठ आणि उपअभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्या सुरू होण्यापूर्वी सर्व अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रातील बांधकामांच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करावी लागणार आहे. त्यानंतर परिशिष्ट-अमध्ये निर्धारित केलेली ‘सेफ्टी कम्प्लायन्स चेकलिस्ट’ भरून सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या बांधकामांच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसेल, तेथील काम तातडीने बंद केली जातील.

ठेकेदार जबाबदार

शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले आहे की, बांधकामे वेळेत पूर्ण करण्याच्या दबावामुळे नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षा नियमांचे उल्लंघन किवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारांची जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यांच्यावर करारातील अटींनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे बांधकामांच्या ठिकाणी जबाबदारी वाढली आहे.

कामगारांना सुरक्षा साधने देणे बंधनकारक

बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ठेकेदारांची असेल. सुरक्षा साधनांशिवाय कामगारांकडून काम करून घेता येणार नाही. केवळ काम वेळेत पूर्ण करण्याच्या घाईत सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.

FAQ

१. पुणे महापालिकेने कोणता निर्णय घेतला आहे?

सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास शहरातील सुरू असलेली बांधकामे रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

२. महापालिकेने कोणाला इशारा दिला आहे?

शहरातील बांधकाम ठेकेदारांना कडक इशारा दिला आहे.

३. हा निर्णय घेण्यामागील कारण काय आहे?

बांधकामाच्या वेगामुळे नागरिक आणि कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, हा उद्देश आहे.

Web Title: Pune municipal corporation has issued stern warning to contractors regarding ongoing construction work in city nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

पुण्यात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सतर्क; बांधकामस्थळांना बजावण्यात आल्या नोटिसा
1

पुण्यात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सतर्क; बांधकामस्थळांना बजावण्यात आल्या नोटिसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.