गणेशोत्सव 2026 (फोटो- ai gemini)
विशेषतः पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढत असल्याने शाडू मातीच्या मूर्तींचे फोटो, आकार, रंगसंगती आणि किमती ऑनलाइन पाहून त्यानुसार मूर्तीची निवड केली जात आहे. काही मूर्तिकारांकडून सोशल मीडियावर मूर्तींचे कॅटलॉग उपलब्ध करून दिले जात असून, ग्राहकांकडून ऑनलाइन आगाऊ नोंदणीही स्वीकारली जात आहे. त्यामुळे मूर्तिकार आणि ग्राहक यांच्यातील व्यवहाराची पद्धतही बदलत आहे.
यासोबतच गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले दूर्वा, फुले, हार, पत्री, पूजेचे साहित्य, नैवेद्याचे साहित्य, आरतीची पुस्तके तसेच सजावटीच्या वस्तू यांचीही ऑनलाइन ऑर्डर केली जात आहे. घरातूनच विविध वस्तूंची निवड करून एकाच ठिकाणी ऑर्डर देण्याची सुविधा मिळत असल्याने विशेषतः नोकरी करणारे आणि वेळेअभावी धावपळ करणारे नागरिक या पर्यायाला पसंती देत आहेत.
पुण्यातील मध्यवर्ती पेठांपासून उपनगरांपर्यंत गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी काही ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळत आहेत. त्यामुळे पारंपरिक गणेशोत्सवाच्या बाजारपेठेला डिजिटल बाजारपेठेची जोड मिळाली आहे.
Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?
दरम्यान, ऑनलाइन खरेदी करताना मूर्तीचा आकार, शाडू मातीचा वापर, रंग, विसर्जनाची पद्धत, डिलिव्हरीची वेळ आणि पॅकेजिंग यांची माहिती ग्राहकांनी तपासणे आवश्यक आहे. विशेषतः नाजूक गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांकडून सुरक्षित पॅकिंग आणि वेळेत घरपोच सेवा देण्यावर भर दिला जात आहे. प्रत्यक्ष बाजारपेठेतील गणेशोत्सवाची पारंपरिक खरेदी कायम असली, तरी ऑनलाइन बुकिंग आणि घरपोच सेवेने पुण्याच्या गणेशोत्सवाच्या खरेदीला नवा डिजिटल आयाम मिळाला आहे.






