फोटो सौजन्य सोशल मिडिया
पुण्यात पिंपरी- चिंचवडमध्ये तापकीर चौकाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस (MH 02 BQ 1087) एका डिवायडरला धडकली. समोरच्या वाहनाला बस धडकणार म्हणून बस चालकाने अचानक वळण घेतले. आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस एका डिवायडरला धडकली. ही घटना दुपारी सव्वा-दोनच्या सुमारास घडली.
स्कूलची बस चालकाने सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडले होते. चालकाला चक्कर आल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडला असे सांगितले जाते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बस चालकाने सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडले होते. तेव्हा बसमध्ये कोणतेही विद्यार्थी उपस्थित नव्हते. बसमध्ये चालक आणि एक महिला कर्मचारी प्रवास करत होते. या अपघातात बस चालक आणि एक महिला कर्मचारी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहेत.
बस चालकाने बस डिवायडरला धडकल्या नंतर पिंपरी- चिंचवडमध्ये काळेवाडी परिसरात थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पण नागरिकांच्या प्रयत्नमुळे वाहतूक हटवण्यात आली. बस चालकाला आणि महिला कर्मचारीला बाहेर काढण्यात आले. तसेच क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये काळेवाडी परिसरातील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.






