Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Traffic: पुणेकरांनो, लक्ष द्या! पुण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवे नियोजन; तीन भागांत होणार बदल

पुणेकरांनो, या तीन भागांतून वाहन घेऊन जात असाल तर जरा थांबा... तुमचा नेहमीचा मार्ग बदलणार आहे! नेमके कुठे वाहतूक वळवली जाणार, कुठे पार्किंग बदलणार आणि कोणते राईट टर्न बंद होणार? जाणून घ्या...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 08, 2026 | 05:41 PM
Pune Traffic: पुणेकरांनो, लक्ष द्या! पुण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवे नियोजन; तीन भागांत होणार बदल

Pune Traffic: पुणेकरांनो, लक्ष द्या! पुण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवे नियोजन; तीन भागांत होणार बदल

Follow Us
Follow Us:
  • भूमकर चौकातून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या मार्गात बदल
  • सदाशिव पेठेत पार्किंगची नवी व्यवस्था
  • मुंढव्यात दोन ठिकाणी राईट टर्न बंद
Pune Traffic: पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिंहगड, दत्तवाडी आणि मुंढवा वाहतूक विभागांतर्गत काही मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. संबंधित वाहतूक बदल लवकरच लागू करण्यात येणार असून, त्याबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना २१ सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे येथे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

भूमकर चौकातील वाहतूक बदल

सिंहगड वाहतूक विभागाच्या हद्दीत भूमकर चौकातून सर्व्हिस रस्त्याने स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. मंदिराकडून भूमकर चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मंदिराच्या डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड एकेरी करण्यात येणार आहे. मंदिरासमोरील सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या पुलावर केवळ भूमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराकडून या पुलावर येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे मंदिराकडून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मंदिराच्या डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड वापरावा लागणार आहे.

हेही वाचा: Accident News: गोंदिया-बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-बोलेरोची जोरदार धडक, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ७ गंभीर

दत्तवाडी परिसरात पार्किंग बदल

दत्तवाडी वाहतूक विभागाच्या हद्दीत एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, सदाशिव पेठ यासमोरील रस्त्यावर सुमारे ५० मीटर अंतरात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी पी-१ आणि पी-२ पार्किंग व्यवस्था लागू केली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी पार्किंगचे नियम आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

मुंढव्यात दोन ठिकाणी राईट टर्न बंद

मुंढवा वाहतूक विभागांतर्गत आर्मी गेट आणि मेरिट सूट येथील राईट टर्न बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना थेट उजवीकडे वळता येणार नाही. संबंधित वाहनांना पुढील उपलब्ध वळणाचा वापर करून इच्छित दिशेने जावे लागणार आहे.

हेही वाचा: Pune News: केतनचा हात-पाय मोडून अपंग करण्याचा होता प्लॅन; डिलीट केलेल्या चॅटमधून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

या वाहतूक बदलांचा मुख्य उद्देश संबंधित भागातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि वाहनांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे बदल लागू झाल्यानंतर वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा. या वाहतूक बदलांची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे. नव्या वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास त्या २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत

Web Title: Pune traffic new plan to avoid traffic congestion in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 05:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.