Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विद्यापीठातही FDA चा दणका; कॅन्टीनचा अन्न परवानाच निलंबित, अन्नसुरक्षेतील आढळल्या गंभीर त्रुटी

तक्रारींची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांच्या नेतृत्वाखाली भोजनगृहाची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान भोजनालयात कीटकनियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचे दिसून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 12:12 PM
FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश

FDA ची पुन्हा मोठी कारवाई; कराडातील दोन हॉटेल्सना तात्पुरते बंदचे आदेश

Follow Us
Follow Us:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहात (केंद्रीय रेफेक्टरी) अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि अस्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. तपासणीत अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने भोजनगृह चालवणाऱ्या ‘श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’चा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भोजनात झुरळे, किडे आढळणे तसेच शिळे अन्न दिले जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होत्या. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. तक्रारींची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांच्या नेतृत्वाखाली भोजनगृहाची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान भोजनालयात कीटकनियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचे, परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे तसेच अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल सादर करण्यात आले नसल्याचे आढळून आले. या सर्व बाबी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे एफडीएने नमूद केले आहे.

Maharashtra Politics : हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन गिधाड’; काँग्रेस नेते नाना पटोलेंचा टोला

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, या कारणास्तव अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत संबंधित भोजनालयाचा परवाना निलंबित करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठातील केंद्रीय भोजनालयाची सेवा सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

…तरच भोजनालय पुन्हा सुरु होणार

संबंधित ठेकेदाराने सर्व आवश्यक सुधारणा करून अन्नसुरक्षा नियमांचे पालन केल्यानंतरच भोजनालय पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

गुणवत्ता मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे होईल

“मागील एका वर्षात विद्यापीठातील विविध मेस व कॅन्टीनमधील अन्नामध्ये किडे, अळ्या, झुरळे, केस व इतर आरोग्यास हानिकारक घटक आढळल्याच्या ५० हून अधिक तक्रारी समोर आल्या आहेत. रिफॅक्टरी मेस येथे एफडीएच्या तपासणीतही अनेक नियमभंग निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या संबंधित मेस व कॅन्टीन चालकांवर नियमानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा कारवाईमुळे अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि गुणवत्ता मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे होईल.”

– अभिषेक शेलकर, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती (विद्यापीठ युनिट – SPPU)

Web Title: Pune university canteens food license suspended action by fda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • FDA
  • Food License
  • Pune University

संबंधित बातम्या

Junk Food Ban Near Schools: पिझ्झा, बर्गर खाणाऱ्या मुलांच्या अडचणी वाढणार; शाळांच्या परिसरात ‘हे’ पदार्थ मिळणार नाहीत!
1

Junk Food Ban Near Schools: पिझ्झा, बर्गर खाणाऱ्या मुलांच्या अडचणी वाढणार; शाळांच्या परिसरात ‘हे’ पदार्थ मिळणार नाहीत!

Pune Education News: विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च करूनही ‘वाय-फाय’ बंद; निष्क्रिय आयटी सेलवर कारवाईची मागणी
2

Pune Education News: विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च करूनही ‘वाय-फाय’ बंद; निष्क्रिय आयटी सेलवर कारवाईची मागणी

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
3

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
4

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.