पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही महाविकास आघाडीसह त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आणि बैठकींनाही त्यांची उपस्थिती दिसत नव्हती. त्यातच काल ( 30 जानेवारी) त्याच वेळी रविंद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली आणि त्यांच्या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात सुरूवात झाली.
त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी यावर स्पष्टीकरण देत आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांबाबत बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, “मी फक्त माझ्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. मी नेहमीच विरोध करत आलो आहे, मात्र काही वेळा कामं अडतात. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन काही कामांचा पाठपुरावा करण्यासाठी भेट घेतली होती. मी सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार करत नाही. मी कायमच विरोधात लढत आलो आहे आणि अजूनही लढत राहीन. कालची भेट माझ्या वैयक्तिक कारणासाठी होती, आणि त्यात पक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही.”
Budget Session 2025: आजपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; ‘ही’16 विधेयके सादर होणार
ते पुढे म्हणाले, “मी शिवसेना शिंदे गटात जाणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटलो होतो. माझ्या कामासाठीच ही भेट होती. शिवसेनेत प्रवेश करण्याबद्दल जी चर्चा आहे, ती अयोग्य आहे. माझा एक प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी त्यांना भेटलो. आणि हो, जर मला वाटले तर मी उद्या अजितदादांना देखील भेटेन, कारण त्यांच्याशी माझी जुनी ओळख आहे.”
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची महायुतीमध्ये सामील होण्याची स्पर्धा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगर संदर्भात भाष्य करताना सांगितले की, “काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात आहेत, आणि लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल,” ज्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली होती.
Donald Trump Threat BRICS: ट्रम्प यांची भारत आणि चीनला थेट धमकी
याच दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार आणि पुण्यातील रविंद्र धंगेकर यांच्या शिवसेनेत संभाव्य प्रवेशाबद्दल काही बातम्या आल्या होत्या. विशेषतः, धंगेकर यांनी शिंदे गटाच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे या चर्चांना वेग मिळाला. या सर्व बाबींचा विचार करत, आज धंगेकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांच्या पुढील निर्णयाबाबत कोणतीही गोंधळाची स्थिती नाही आणि त्यांचा पक्ष बदलण्याचा विचार नाही.