Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: गणेशोत्सवात पुणेकरांची चिंता मिटणार… मेट्रो धावणार रात्रभर? वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या नवे नियोजन

गणपती दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर पडणाऱ्या पुणेकरांसाठी मेट्रोने असा प्लॅन आखला आहे की, ज्यामुळे रस्त्यावरील गर्दीची चिंता काही प्रमाणात कमी होऊ शकते. मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा, गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो आणि विसर्जनाच्या दिवशी सलग ४१ तास सेवा, असा मोठा बदल करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 10, 2026 | 09:35 AM
Pune News: गणेशोत्सवात पुणेकरांची चिंता मिटणार... मेट्रो धावणार रात्रभर? वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या नवे नियोजन

Pune News: गणेशोत्सवात पुणेकरांची चिंता मिटणार... मेट्रो धावणार रात्रभर? वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या नवे नियोजन

Follow Us
Follow Us:
  • मेट्रो सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार
  • गणेशोत्सव काळात मेट्रोची वारंवारता वाढवण्यात येणार
  • विसर्जनासाठी ४१ तास सेवा सुरू राहणार
पुणे: गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष नियोजन केले आहे. भाविकांना गणपती मंडळांचे दर्शन घेणे आणि रात्री उशिरा सुरक्षितपणे परतणे सोयीचे व्हावे, यासाठी मेट्रोच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार असून, १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान सेवा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

१४ ते १६ सप्टेंबर नियमित वेळा

गणेश चतुर्थीपासून सुरुवातीच्या तीन दिवसांत म्हणजेच १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत सुरू राहील. त्यानंतर उत्सवातील गर्दी वाढण्याच्या पार्श्वभूमीवर विस्तारित वेळापत्रक लागू होईल.

१७ ते २४ सप्टेंबर मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेवा

१७ ते २४ सप्टेंबरदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो सकाळी सहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत धावणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणपती मंडळांचे दर्शन घेणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच गणेशोत्सवातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्यांमधील अंतर कमी करण्यात आले आहे. या काळात मेट्रो दर पाच मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत याचा फायदा प्रवाशांना होण्याची शक्यता आहे.

विसर्जनासाठी सलग ४१ तास सेवा

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोने विशेष नियोजन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून २६ सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सेवा सलग सुरू राहणार आहे. म्हणजेच तब्बल ४१ तास अखंड मेट्रो सेवा उपलब्ध असेल. २७ सप्टेंबरपासून पुन्हा नियमित वेळापत्रक लागू होईल.

गणपती दर्शनासाठी कोणत्या स्थानकाचा वापर कराल?

मध्यवर्ती पुण्यातील गणपती मंडळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी नियोजित स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्गिका १ वरील प्रवाशांनी कसबा पेठ स्थानकाचा, तर मार्गिका २ वरील प्रवाशांनी डेक्कन जिमखाना किंवा पीएमसी स्थानकाचा वापर करावा, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे.

मंडई स्थानकाबाबत विशेष सूचना

महात्मा फुले मंडई स्थानकावर दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान या स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय लक्षात घेता मेट्रोच्या या विशेष वेळापत्रकामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Relief for pune residents during ganeshotsav will the metro run all night schedule announced check out the new plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.