Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रलंबित मागण्यांसाठी RTO कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक; पुण्यासह पिंपरी कार्यालयात शुकशुकाट

गेल्या काही वर्षांपासून आरटीओ कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यातच महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे, विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात बदल केले आहेत, असा आरोप केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2024 | 07:35 PM
प्रलंबित मागण्यांसाठी RTO कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक; पुण्यासह पिंपरी कार्यालयात शुकशुकाट

प्रलंबित मागण्यांसाठी RTO कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक; पुण्यासह पिंपरी कार्यालयात शुकशुकाट

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: आकृतीबंधाच्या योग्य अंमलबजावणीसह वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरुवात केली. त्यामध्ये विभागातील पुणे, पिंपरी आणि बारामती आरटीओ कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे पुणे आरटीओ कार्यालयात कामानिमित्त झालेल्या नागरिकांना निराश होवून परत जावे लागले. गेल्या काही वर्षांपासून आरटीओ कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यातच महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे, विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात बदल केले आहेत, असा आरोप केला जात आहे. कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्यानंतर राज्याच्या परिवहन आयुक्तांनी बैठक घेतली. मात्र, तोडगा न निघाल्याने चर्चा फिसकटली आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला.

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर आणि मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना सरचिटणीस सुरेंद्र सरतापे म्हणाले, “प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाशी चर्चा केली. मात्र, तोडगा न निघाल्याने नाईलाजाने आंदोलनाची हाक दिली आहे. प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.’

गणपतीमुळे आधीच कार्यालयांना सुट्टी होती. आता काम मार्गी लागेल या विचाराने सकाळी पुणे आरटीओ येथे आलो. मात्र, संप सुरू झाल्याचे कळाले त्यामुळे आता चौथ्यांदा हेलपाटा मारावा लागणार. या आधी साॅफ्टवेअर बंद असल्यामुळे घरी जावे लागले तर आज संप.

– सचिन दगडे, नागरिक

आकृतीबंध लागू करावा, कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात याव्यात, महसूल स्तरावर केलेले बदली धोरण रद्द करावे यासाठी संघटना पाठपुरावा करत आहे. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

– जगदीश कांदे, कार्याध्यक्ष, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र

चौकट मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्त्या

आरटीओतील कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यानंतर लायसन्ससह इतर दैनंदिन कामासाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यालयाने अनेक ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र, तरीही अनेक नागरिकांचा याचा फटका सहन करावा लागला.

Web Title: Rto employee strike for pending demands at pune pimpri and baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 07:30 PM

Topics:  

  • Pune
  • RTO Office

संबंधित बातम्या

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
1

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
2

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
3

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन
4

Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.