शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! काल गोळीबार अन् हल्ल्याचा थरार अन् आज पुन्हा धमकीचा मेल

Pune District Sessions Court Shivajinagar Court receives threat mail for the third time
पुणे शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • पुणे शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न

  • शिवाजीनगर कोर्टाला पुन्हा धमकीचा मेल

  • धमकीच्या मेलमध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी

Pune Court Threatening email : पुणे :  पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये असलेल्या शिवाजीनगर न्यायालयाबाहेर जीवघेणा हल्ला व गोळीबार झाल्याच्या घटनेला २४ तास होत नाहीत, त्यामध्येच पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्याचे समोर आले आहे. तिसऱ्यांदा न्यायालयाला मेल आल्याचे समोर आले आहे.

पुण्यात होणाऱ्या गोळीबाराच्या घटना, कोयता गँग यामुळे शहराच्या सुरक्षेचा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये पूर्ववैमनस्यातून शिवाजीनगर कोर्टासमोर मंदार किवळे याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये आता पुन्हा एकदा कोर्टाला धमकीचा मेल आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यायालयाबाहेर झालेल्या घटनेनंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य सत्र न्यायाधीश अंजू शेटे आणि पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयातील सुरक्षा उपाययोजनांच्या चर्चा झाली. या बैठकीनंतर पुन्हा कोर्टाला धमकीचा मेल आला आहे. याचबरोबर पुणे जिल्हा न्यायालयातील 70 टक्के सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आहे.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

मीडिया रिपोर्टनुसार, पुणे जिल्हा सत्र न्यायालयला आलेल्या तिसऱ्या मेलमध्येही कोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. बॉम्बने उडून देण्याचे धमकीच्या मेलमध्ये लिहिले आहे. बॉम्ब शोधक पथक पुणे कोर्टात दाखल झाले. कोर्टात उपस्थित लोकांना बाहेर काढले जात आहे. पुणे कोर्ट परिसरात भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. मुंबई पाठोपाठ आता पुणे कोर्टाला धमकीचा मेल आला.

पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'

Q

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाला किती वेळा धमकीचे ई-मेल आले आहेत?

A

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाला आतापर्यंत तीन वेळा धमकीचे ई-मेल आल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या ई-मेलमध्येही न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Q

पुणे जिल्हा न्यायालयाला आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर काय कारवाई करण्यात आली?

A

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथक पुणे जिल्हा न्यायालयात दाखल झाले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयात उपस्थित असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Q

पुणे जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणती माहिती समोर आली आहे?

A

पुणे जिल्हा न्यायालयातील तब्बल ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच न्यायालयाबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुख्य सत्र न्यायाधीश अंजू शेटे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यात सुरक्षा उपाययोजनांबाबत बैठकही झाली होती.