Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरेगाव भीमासाठी ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी येतात. त्यानिमित्त पुणे पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैणात असणार आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 30, 2021 | 05:07 PM
कोरेगाव भीमासाठी ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोरेगाव भीमा परिसरात पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. एक जानेवारी रोजी येथे देशभरातून हजारो नागरिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यानिमित्त वाहतूकीत देखील बदल करण्यात आला आहे. शुक्रवारी (३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी पाचपासून वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच नगरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. हा बदल एक जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी येतात. त्यानिमित्त पुणे पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैणात असणार आहे. तसेच, या भागातील गर्दी विचारात घेऊन वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. वाहन पार्किंगसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले आहे.

अशी आहे वाहतूक बदल व्यवस्था…

पुण्याकडून नगरकडे जाणारी जड वाहतूक खराडी बाह्यवळण मार्ग, हडपसर, सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरेमार्गे शिरूरकडून नगर रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्यावरून आळंदी, चाकणकडे जाणारी जड वाहने (टेम्पो, ट्रक) हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळण मार्ग, विश्रांतवाडीमार्गे आळंदी, चाकणकडे जातील. मुंबईहून नगरकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळे फाटामार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईहून नगरकडे जाणारी हलकी वाहने (मोटार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जातील.

१२ ठिकाणी पार्किंग, पीएमपी बससेवा

वाहतूक पोलिसांनी पेरणे गाव तसेच तुळापूर फाटा, लोणीकंद परिसरातील बारा ठिकाणी दुचाकी, मोटारी लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पार्किंग स्थळापासून विजयस्तंभाकडे जाण्यासाठी पीएमपी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून नागरिक येणार आहेत. परिसरात ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. शुक्रवारी सकाळपासून बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून बाहेरगावाहून सातशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी येणार आहेत.

Web Title: Strict police security at koregaon bhima nrsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2021 | 04:37 PM

Topics:  

  • Koregaon Bhima
  • police security

संबंधित बातम्या

सण, उत्सवांसाठी मुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर; गर्दी टाळण्याचे असणार आव्हान
1

सण, उत्सवांसाठी मुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर; गर्दी टाळण्याचे असणार आव्हान

मुंबईतील यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी
2

मुंबईतील यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी

Pahalgam Terror Attack: पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर; कल्याण डोंंबिवलीत पोलीसांची मोठी कारवाई
3

Pahalgam Terror Attack: पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर; कल्याण डोंंबिवलीत पोलीसांची मोठी कारवाई

रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्टमोडवर; सिंधुदुर्गात चोख बंदोबस्त
4

रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्टमोडवर; सिंधुदुर्गात चोख बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.