सौजन्य - नवराष्ट्र टीम
खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचा दावा मनसेने केला आहे. जलवाहिन्यांची तपासणी करून गळती तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली. बांधकामे आणि रस्त्यांवरील दुभाजकांच्या देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. बांधकामांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बंधनकारक करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
नियोजनातील त्रुटींचा भार नागरिकांवर का?
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः उंचावरील भागांत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींची शिक्षा नागरिकांना का, असा सवाल मनसेने उपस्थित केला.
Ans: पुणे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना हा निर्णय घेण्याची गरज काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे.
Ans: पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने रद्द करून पुणेकरांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
Ans: पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेतर्फे मटका फोड आंदोलन करण्यात आले. तसेच मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ संभाजी बाबर यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले.






