Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Traffic Rules: दुचाकी चालकांसोबतच सहप्रवाशांनाही हेल्मेटची सक्ती; वाहतूक विभाग कडक कारवाई करणार

विनाहेल्मेट वाहनचालकांवरच सीसीटीव्हीद्वारे कारवाई केली जाते. पुण्यात सरासरी दररोज अशा प्रकारे ४ हजार चालकांवर कारवाई केली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 28, 2024 | 02:35 AM
Traffic Rules: दुचाकी चालकांसोबतच सहप्रवाशांनाही हेल्मेटची सक्ती; वाहतूक विभाग कडक कारवाई करणार

Traffic Rules: दुचाकी चालकांसोबतच सहप्रवाशांनाही हेल्मेटची सक्ती; वाहतूक विभाग कडक कारवाई करणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक: विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई होत असताना आता सहप्रवासी (दुचाकीवरील पाठिमागे बसलेला) याच्यावर देखील हेल्मेट परिधान न केल्यास कारवाई होणार आहे. त्यामुळे आता एखादा वाहन चालक मित्राला किंवा त्याच्या सहकाऱ्याला दुचाकीवर विना हेल्मेट नेत असेल तर दंड वाहन चालकाला सोसावा लागणार आहे. येत्या काही दिवसात ही कारवाई तीव्र स्वरूपात करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाने सर्व पोलीस घटकांना दिले आहेत.

राज्यात अपघातात वाहन चालक तसेच दुचाकीवरील सहप्रवासी यांच्या मृत्यु तसेच जखमींच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. हेल्मेट सक्ती असताना देखील अनेक वाहन चालक हेल्मेट परिधान करत नाहीत. तर, सहप्रवासी देखील हेल्मेट परिधान करत नाहीत. त्यामुळे आता विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई होणार आहे. पुणे शहरात हेल्मेटची कारवाईचा आकडा हा वर्षाला काही कोट्यवधींमध्ये आहे. त्यात आता पाठिमागे बसलेल्या व्यक्तीला देखील दंड होणार असल्याने पोलीस व वाहन चालकांमध्ये वादाचे कारण ठरणार असल्याचे दिसते.

हेही वाचा: भाजपने लोकसभा निवडणुकीतील गाफिलपणाची उणीव भरुन काढली; महाविकास आघाडीला बसला फटका

वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना यासंबंधित आदेश दिले आहेत. त्याबाबतचे पत्र नुकतेच सर्वांना पाठविले आहे. आता सहप्रवाशांवर स्वतंत्र हेड खाली कारवाई होणार आहे. तत्पुर्वी मोठ्या शहरांमध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त होतो. असे असले तरी सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाई करतात. सध्या राज्यात दुचाकीवरील पिलियन रायडर (सहप्रवासी) वर कारवाई केली जात नाही. त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी ई चालान मशीनमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

आदेशात काय म्हटले आहे
वाहतूक पोलीस सेक्शन १२८ आणि १२९ मोटार वाहन कायदा १९८८ कायद्यातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकी चालक व पिलीयन रायडर (सहप्रवासी) यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबंधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना द्यावी. प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तरी ई चालान मशीनमध्ये सेक्शन १२९/१९४ (ड) एमव्ही ए शिर्षकामध्ये बदल करण्यात येत असून या पुढील कारवाई ही विना हेल्मेट रायडर व विना हेल्मेट पिलीयन रायडर (सह प्रवासी) अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली प्रभावीपणे करावी. जेणेकरुन दुचाकीस्वार चालक व सह प्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींची संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होईल.

विनाहेल्मेट वाहनचालकांवरच सीसीटीव्हीद्वारे कारवाई केली जाते. पुण्यात सरासरी दररोज अशा प्रकारे ४ हजार चालकांवर कारवाई केली जाते. त्याचा दंड अनेक वाहनचालक भरत नाही. त्यामुळे लोकअदालतीत या सर्व केसेस ठेवण्यात येतात. ज्याचे वाहन चालकांना कळविले जाते. तेव्हा बहुतेक वाहनचालक दंड भरतात. आता सहप्रवाशांवर दंड लागू केल्यास त्याचाही दंड वाहन चालकांनाच भरावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वाद होण्याची शक्यता आहे.

Web Title: Traffic police helmet made mandatory for both two wheeler riders and passengers at pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • Pune Traffic Police

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
2

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
3

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
4

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.