Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Update: पुण्याला पावसाने झोडपले; पेठ भागात जोरदार हजेरी, नागरिकांची त्रेधातिरपीट

Maharashtra Weather Update: गेले तीन ते चार दिवस पुण्यात देखील ढगाळ हवामान दिसून येत होते. आज अखेर पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2025 | 05:59 PM
Pune Rain Update: पुण्याला पावसाने झोडपले; पेठ भागात जोरदार हजेरी, नागरिकांची त्रेधातिरपीट
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान गेले तीन ते चार दिवस पुण्यात देखील ढगाळ हवामान दिसून येत होते. आज अखेर पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लवी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडलेली पाहायला मिळाली. पावसाच्या सरी कोसळल्याने मातीचा छान सुगंध दरवळत होता.

जवळपास पुणे शहर आणि उपनगर या भागात पावसाने काही काळ हजेरी लावली. अचानक पाऊस आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला थांबून आसरा घ्यावा लागला. अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासाह पाऊस सुरू आहे. सदाशिव, शुक्रवार, नवी, नारायण पेठ भागात अजूनही पाऊस सुरू आहे.

पुण्याच्या काही भागात गारांचा वर्षाव देखील झाल्याचे समोर येत आहे. खंडकवासला धरण क्षेत्र, बालेवाडी , स्वारगेट , धनकवडी भागात देखील हलक्या सरी कोसळत आहेत.

अवकाळी पावसाचा आंबा, काजूच्या बागांना मोठा फटका

रत्नागिरी जिल्हयावर वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

अवकाळी पावसाचा आंबा, काजूच्या बागांना मोठा फटका; कोकणातील व्यापारी चिंतेत, IMD चा इशारा काय?

महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे

हवामान विभगाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. हवामान विभगाने राज्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Unseasonal rain at pune city and all peth areas relief for summer heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • maharashtra weather update
  • Pune Rain

संबंधित बातम्या

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
1

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार
2

Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू
3

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू

Pune Heavy Rain: पुणेकरांची दाणादाण! गुडघाभर पाणी आणि बुडालेल्या कार; अवकाळी पावसाने पुण्यात उडवला हाहाकार
4

Pune Heavy Rain: पुणेकरांची दाणादाण! गुडघाभर पाणी आणि बुडालेल्या कार; अवकाळी पावसाने पुण्यात उडवला हाहाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.