Maharashtra Weather Update: कोकण भागात विजांच्या कडकडाटासह ताशी 30-50 किमी वेगाचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणाला पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे
Maharashtra Breaking News: आज १० सप्टेंबर रोजी मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर ९५ डॉलरच्या वर पोहोचल्याने जागतिक आणि भारतीय भांडवली बाजारावर मोठा दबाव दिसून येत…
गणेशोत्सवाच्या उत्साहाला आता पावसाची साथ मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने राज्यातील पावसाची तीव्रता घटत आहे. त्यामुळे पुणे शहरात पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट, तर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. परिणामी शुक्रवारी शहरातील ऐतिहासिक भिडे पूल पाण्याखाली गेला.
हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक धरणे तुडुंब भरली आहेत.
पुणे शहरात बुधवारी दिवसभर ऊन आणि हलक्या सरींचा खेळ सुरू होता. काही भागांत हलका ते अतिहलका पाऊस पडला. शहराचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस…
यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्याच दहा दिवसांत पुण्याने सरासरी मासिक पावसाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर संपूर्ण महिनाभर सक्रिय राहिलेल्या मान्सूनमुळे शहरात वारंवार मुसळधार पाऊस झाला.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील महत्वाच्या धारणांच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी तुडुंब भरली आहे.
सोमवारी पहाटे हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला. त्यानंतर सलग दोन ते तीन तास शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला.
पुणे शहरात पुढील तीन दिवस आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर अधिक राहिला.
पुणे शहरात बुधवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणात गारवा जाणवत होता.