Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुणेकरांसाठी गुडन्यूज! खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात

खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे मागील वर्षी १०० टक्के भरली होती. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने, शहरात पाण्याची मागणी वाढली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2025 | 05:55 PM
Pune News: पुणेकरांसाठी गुडन्यूज! खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात

Pune News: पुणेकरांसाठी गुडन्यूज! खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: मान्सूनपूर्व पावसाची गेल्या दोन दिवसांपासूनच्या दमदार हजेरीमुळे खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये पाणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. दरवर्षी जूनच्या मध्यापासून या धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरूवात होते, मात्र या वर्षी २५ मेपासूनच धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून, २७ मेपर्यंत या चारही धरणांमधील पाणीसाठा हा ५.७४ टीएमसी इतका झाला आहे.

खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे मागील वर्षी १०० टक्के भरली होती. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने, शहरात पाण्याची मागणी वाढली होती. परंतु, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पहिल्यांदाच मे महिन्यातच वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

सोमवारी दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. दरवर्षी मान्सूनच्या आगमनानंतर दहा ते बारा दिवस सलग पाऊस झाला तरच जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा अवकाळी पावसाने मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी पाणीसाठ्यात वाढ केली आहे.

एकट्या सोमवारी म्हणजे २६ मे रोजीच मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी या चारही धरणांमध्ये २८ एमएलडी पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. या चारही धरणांत १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने २६ मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर दिवसभरात महापालिकेचा शहराचा पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा आज सकाळी आठपर्यंत ५.७४ टीएमसी झाला आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून आज म्हणजेच २७ मेच्या सकाळी आठपर्यंत खडकवासला धरण परिसरात १६ मिमी, पानशेत धरण परिसरात ९९ मिमी, वरसगाव धरण परिसरात ९२ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. या धरणातून शहरासह, जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना आणि सिंचना योजनांसाठी पाणी दिले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांप्रमाणेच जून महिन्यातच कपात ओढावण्याची शक्यता होती. मात्र, यंदा मे महिन्यातच पाणी वाढण्यास सुरुवात झाली.

जलसंपदा विभागाच्या भीमा खोरे पुरनियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, भीमा खोर्यातील २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी आहे.

वीर धरण ४० टक्के भरले

वीर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वीर धरण ४०.६५ टक्के भरले असून, धरणात उपयुक्त पाणीसाठा ३.८२ टक्के इतका आहे. गेल्यावर्षी याच तारखेला म्हणजे २७ मे रोजी १३ टक्के भरलेले होते. तर पावसाची शून्य टक्के हजेरी होती.

Web Title: Water lever increase in khadakwasla dam chain pune rain marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Pune
  • Pune Rain

संबंधित बातम्या

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन 
1

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन 

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
2

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

Pune Rain: कमबॅक असावं तर असं! १५ दिवसांची उणीव भरून काढली; पुण्यात पावसाचे अक्षरशः तांडव
3

Pune Rain: कमबॅक असावं तर असं! १५ दिवसांची उणीव भरून काढली; पुण्यात पावसाचे अक्षरशः तांडव

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
4

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.