सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल उभा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले होते. ते स्वतः मुरुम वाल्हे गटातून उमेदवारी लढवत होते. मात्र त्यांचा साडे सहा हजार मतांनी मोठा पराभव झाला. जगताप यांना ७३६४ मते मिळाली. तर ऐनवेळी जगताप यांच्या जागी संधी मिळालेले बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले यांना १३८०० मते मिळाली.
पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांना सभासदांनी साफ नाकारल्याचे चित्र आहे. विजयाचा विश्वास असणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तेरा वर्षांपासून पुरुषोत्तम जगताप हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मतदारांनी पुरुषोत्तम जगताप यांची बंडखोरी एक प्रकारे नाकारली. ज्यावेळी पक्षाला गरज होती तेव्हा पक्षाच्या विरोधात जाऊन केलेली बंडखोरी सभासदांना रुचली नाही हे या निकालावरून स्पष्ट होते.
Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान
पुरुषोत्तम जगताप हे सोमेश्वर सहकारी साखर कारखाने सुमारे ३४ वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. तर १३ वर्षे ते कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मुरूम वाल्हा या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलचे उमेदवार विक्रम भोसले (१३८५४), ऋषिकेश गायकवाड ( १३९४१) तर ईश्वर चे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे (१४०९५) हे विजयी झाले आहेत. पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव केल्यानंतर विक्रम भोसले व राजवर्धन शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना बंडखोरी बारामती मध्ये चालत नाही. पुरुषोत्तम जगताप यांचा मीपणा सभासदांनी संपवला अशी प्रतिक्रिया दिली.






