इंडिगोच्या फ्लाइट रद्दमुळे बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआउट फेरीचे सामने स्थलांतरित केले आहेत. इंदूर येथे होणारे नॉकआउट सामने आता पुण्यात होणार आहेत.
संघ प्रेरणेतून चालणाऱ्या संस्थांना जो निधी किंवा ज्या वास्तू देणगीरूपाने दिल्या जातात, त्यांचा उपयोग योग्य त्याच कारणांसाठी होतो, हा विश्वास समाजात निर्माण झाला आहे, असे चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले.
पुण्यात वादग्रस्त गौरी वांजळेवर पुन्हा गुन्हा! कोथरूडमधील अत्याचार प्रकरणानंतर आता मुंढवा पोलिसात खंडणीचा केस. वकील असल्याचे सांगून पीडित तरुणाशी जवळीक, गुंगीचे औषध, अश्लील फोटो व धमक्या देत पैसे उकळण्याचा आरोप.
जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने भारतीय संशोधकांनी ‘अलकनंदा’ ही 12 अब्ज प्रकाशवर्षांवरील प्राचीन पण पूर्ण विकसित सर्पिल आकाशगंगा शोधून काढली आहे. हा शोध प्रारंभीच्या विश्वावरील समज बदलणारा ठरत आहे.
पुण्यातील येरवड्यात नवऱ्याने शारीरिक संबंधांसाठी पत्नीचा आग्रह सहन न झाल्याने तिच्या मांडीवर सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार. विवाहानंतरही नवरा संबंध टाळत होता. पत्नीच्या तक्रारीनंतर पतीवर गुन्हा दाखल.
पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून चुलत भावाचा निर्घृण खून. आरोपी अशोक पंडितने तीन साथीदारांना चार लाखांची सुपारी दिली. पोलिसांनी चार जणांना झारखंडला पळण्यापूर्वीच अटक केली.
वाळूज औद्योगिक वसाहतीत किरकोळ वादातून दोन कामगारांमध्ये ढकलाढकली झाली. यात चंद्रमुनी कांबळे (२५) लोखंडी प्लेटवर पडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. आरोपी लक्ष्मण वाढेकर फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला…
शिरूर नगरपरिषदेचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. शिरूरची निवडणूक आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठेची बनवली असून, प्रचारासाठी वेळेत पोहोचण्याच्या प्रयत्नात नेतेमंडळींची धावपळ सुरू आहे.
प्रेमी जोडप्याची शेवटची भेट जीवघेणी ठरली. लग्नाला मुलीच्या वडिलांचा विरोध असल्याने दोघांमध्ये वाद वाढले. भेटीसाठी मुलाच्या रूमवर गेलेल्या तरुणीची हत्या झाली, तर प्रियकराने ट्रेनखाली येत आत्महत्या केली.
८ नोव्हेंबरपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १११ शिक्षक पदांच्या भरतीला सुरुवात झाली असून ७ डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज व सुधारणा करण्याची संधी आहे.
Maharashtra Government Holiday News : येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेतही दिसून येत…
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकाच दिवशी चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मोदी सरकारने १९,९१९ कोटी रुपयांच्या चार प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेवर पुरुषाला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, ब्लॅकमेल आणि दोन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पुरुषाने तक्रार देताच महिलेवर गुन्हा दाखल झाला.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरु सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील तितकेच नामांकित कलाकार आणि रसिकांना जोडले आहे.
आरआर आणि आरसीबी या दोन संघांकडून आयपीएल २०२६ साठी पुण्याला आपले नवीन होम ग्राउंड म्हणून निवडण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी या दोन संघांकडून MCA सोबत चर्चा करण्यात येत आहे.